रविचंद्रन अश्विन हा भारताच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे.कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज (५३७) असलेल्या अश्विनने ब्रिस्बेन कसोटीनंतर १८ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून सर्वांना आश्चर्यचकित केले.
(AFP)निवृत्तीनंतर रविचंद्रन अश्विनकडे किती संपत्ती आहे, याचा शोध गुगलवर घेतला जात आहे. अश्विनकडे जवळपास १३५ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे समजते. गेल्या वर्षी त्याची नेटवर्थ भारतीय चलनात ११७ कोटी रुपये होती. यंदा त्यात सुमारे १८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
(HT_PRINT)अश्विनला भारतीय क्रिकेटमधून चांगले मानधनही मिळत होते. अश्विनचा बीसीसीआयसोबत अ ग्रेडचा करार होता. म्हणजेच त्याला वार्षिक ५ कोटी रुपये पगार मिळत असे. मॅच फीसह बोर्डाकडून त्याला जवळपास १० कोटी रुपये मिळत होते.
(HT_PRINT)रविचंद्रन अश्विन याला आयपीएल २०२५च्या मेगा लिलावात चेन्नई सुपर किंग्जने ९.७५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. यापूर्वी राजस्थान रॉयल्सकडून त्याला प्रत्येक हंगामात ५ कोटी रुपये मिळत होते. जाहिरातींच्या माध्यमातूनही तो कोट्यवधी रुपये कमवत आहे.
(HT_PRINT)