अल्पावधीतच त्याच्या सब्सक्रायबर्स संख्या हजारोंवर पोहोचली आहे. युट्यूबवर पाऊल ठेवणारा अश्विन हा पहिला भारतीय क्रिकेटपटू नाही. अनेक क्रिकेटपटूंनी आपले युट्यूब चॅनेल सुरू केले आहे.
अल्पावधीतच त्याच्या सब्सक्रायबर्स संख्या हजारोंवर पोहोचली आहे. युट्यूबवर पाऊल ठेवणारा अश्विन हा पहिला भारतीय क्रिकेटपटू नाही. अनेक क्रिकेटपटूंनी आपले युट्यूब चॅनेल सुरू केले आहे.
ऋषभ पंत - ऋषभ पंत हे या यादीत सर्वात नवीन नाव जोडले गेले आहे कारण त्याने यावर्षीच YouTube चॅनेल सुरू केले आहे. तो YouTube वर फारसा सक्रिय नाही कारण तो दर २-३ आठवड्यांनी एक व्हिडिओ अपलोड करतो. त्याच्या सब्सक्रायबर्सची संख्या सध्या २.१ लाख आहे.
आकाश चोप्रा- आकाश चोप्रा याने आपल्या समालोचन शैलीने बरीच लोकप्रियता मिळवली आहे. स्थानिक क्रिकेटच्या व्हिडिओंवरही तो अनेकदा प्रतिक्रिया देताना दिसतो. तो १० ऑगस्ट २०११ रोजी यूट्यूबवर आला. त्याच्या सब्सक्रायबर्सची संख्या इतर क्रिकेटपटूंच्या तुलनेत खूप जास्त आहे. त्याच्या फॉलोअर्सची संख्या ४६ लाखांहून अधिक आहे.
शोएब अख्तर- शोएब अख्तरने २०१९ मध्ये त्याचे यूट्यूब चॅनल सुरू केले, तेव्हा सुरुवातीला त्याच्या सब्सक्रायबर्सची संख्या खूप वेगाने वाढली. अख्तर अनेकदा पाकिस्तान, भारत आणि इतर संघांच्या सामन्यांवर आपले मत व्यक्त करतो. त्याला खेळाडूंच्या कामगिरीचे विश्लेषण करायलाही आवडते. त्याच्या चॅनलला ३७ लाखांहून अधिक लोकांनी सबस्क्राईब केले आहे. त्याचबरोबर त्याच्या एकूण व्ह्यूजची संख्या ४० कोटींच्या पुढे गेली आहे.
सचिन तेंडुलकर- नोव्हेंबर २०१३ मध्ये शेवटचा सामना खेळून सचिन तेंडुलकरने सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा केला होता. त्याने निवृत्तीच्या काही दिवस आधी २६ सप्टेंबर २०१३ रोजी त्याचे YouTube चॅनल सुरू केले, ज्याच्या सब्सक्रायबर्सची संख्या १६ लाखांपेक्षा जास्त आहे. त्याने या चॅनेलवर २७८ व्हिडिओ पोस्ट केले आहेत, ज्यांना आजपर्यंत सुमारे ३९ कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.