रश्मिका मंदनाचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'पुष्पा २ द रुल' येत्या ६ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. अल्लू अर्जुनही या चित्रपटात असणार आहे.
'पुष्पा २: द रुल'ची बॉक्स ऑफिसवर 'छावा'शी टक्कर होणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही चित्रपट ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार असून, हे दोन्ही चित्रपट रश्मिका मंदनाचे आहेत. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत त्यांच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्याची शक्यता आहे.
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, रश्मिका मंदना सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून, पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, रश्मिका मंदना आणि आयुष्मान खुराना ‘स्त्री’ युनिव्हर्सच्या पुढील चित्रपट 'व्हॅम्पायर्स ऑफ विजय नगर'मध्ये दिसणार आहेत.
रश्मिका मंदना लवकरच रणबीर कपूरसोबत 'ॲनिमल पार्क'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.