Rashmika Mandanna: नुकतेच रश्मिका मंदनाने लाल लेहेंग्यातील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
(1 / 5)
‘पुष्पा’ फेम अभिनेत्री रश्मिका मंदना सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय झाली आहे. अभिनेत्री सध्या तिच्या ‘पुष्पा २’मुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर देखील रश्मिकाचा जलवा पाहायला मिळत आहे. (Photo: @rashmika_mandanna/IG)
(2 / 5)
आपल्या क्युट हास्याने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालणारी रश्मिका आपल्या फॅशनसेन्सने देखील सगळ्यांना घायाळ करत असते. नुकतेच रश्मिका मंदनाने लाल लेहेंग्यातील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. (Photo: @rashmika_mandanna/IG)
(3 / 5)
रश्मिका मंदनाने या खास फोटोशूटसाठी सुंदर लाल रंगाचा लेहेंगा निवडला आहे. या लेहेंग्यावर लाल रंगाच्या मॅचिंग धाग्यांनी सुरेख नक्षीकाम करण्यात आले आहे. मोनोटोन लूकचा हा लेहेंगा लेटेस्ट फॅशन स्टाईल लक्षात ठेवून डिझाईन करण्यात आला आहे. (Photo: @rashmika_mandanna/IG)
(4 / 5)
रश्मिकाने हा लूक पूर्ण करण्यासाठी हलक्या मेकअपसह कपाळावर टिकली लावली आहे. या लूकमध्ये रश्मिका खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या मोकळ्या केसांना कर्ल केले आहे. रश्मिकाचा हा स्टनिंग लूक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. (Photo: @rashmika_mandanna/IG)
(5 / 5)
एकीकडे रश्मिकाच्या लूकची चर्चा होत आहे. तर, दुसरीकडे तिच्या या लेहेंग्याच्या किंमतीमुळे देखील ती चर्चेत आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिका मंदनाने परिधान केलेला हा लेहेंगा तब्बल साडेचार लाख रुपयांचा आहे. (Photo: @rashmika_mandanna/IG)