Rashmika Mandanna: साऊथ स्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच चाहत्यांना एक खास सरप्राईज देणार आहे. अभिनेत्री झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार आहे.
(1 / 5)
साऊथ स्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच चाहत्यांना एक खास सरप्राईज देणार आहे. अभिनेत्री झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार आहे.
(2 / 5)
या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने रश्मिका मंदाना तिच्या मराठी चाहत्यांना देखील भेटणार आहे. चित्र गौरव आणि नाट्य गौरव हा मराठी मनोरंजन विश्वातील अतिशय प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे.
(3 / 5)
यावर्षीच्या ‘झी चित्र गौरव २०२३’ सोहळ्याच खास आकर्षण म्हणजे कन्नड, हिंदी, तेलगू आणि तामिळ या ४ भाषांमध्ये काम करत असलेली सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक श्रीवल्ली 'रश्मिका मंदाना'.
(4 / 5)
या सोहळ्यात रश्मिका मंदाना अप्रतिम लावणीवर ठेका धरताना दिसणार आहे. विशेष म्हणजे ही लावणी तिने वन टेक मध्ये केली आहे, सोबतच ती निलेश साबळे आणि अवधूत गुप्ते यांच्यासोबत काही मराठी किस्से देखील शेअर करताना दिसेल.
(5 / 5)
झी चित्रगौरव पुरस्कार २०२३ रविवार २६ मार्च संध्याकाळी ७ वाजता पाहता येणार आहे. यावर्षी अनेक चित्रपटांना या पुरस्कार सोहळ्यात नामांकन मिळाले आहे.