अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू राशिद खानने लग्न करून नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. रशीदचा विवाह गुरुवार, ३ ऑक्टोबर रोजी झाला.
राशीदचा विवाह काबूलमधील इम्पीरियल कॉन्टिनेंटलमध्ये पार पडला. हे हॉटेल एका खास शैलीत सजवण्यात आले होते.
विशेष म्हणजे, काबूलमध्ये झालेला हा विवाह एकट्या रशीदचा नव्हता. याच दिवशी त्याच्या तीन भावांचेही लग्न झाले. म्हणजे चारही भावांचे लग्न एकाच दिवशी झाले. या विवाहसोहळ्यात मोहम्मद नबी याच्यासह अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे अनेक क्रिकेटपटू या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
लग्नामुळे हॉटेलबाहेर फटाक्यांची प्रचंड आतषबाजी पाहायला मिळाली. अफगाणिस्तानसाठी त्याच्यासोबत खेळलेले सर्व क्रिकेटपटू राशिदच्या लग्नाला उपस्थित होते.
या लग्नाला उपस्थित असलेल्या क्रिकेटपटूंच्या यादीत मोहम्मद नबीपासून अनेक दिग्गज आणि स्टार खेळाडू उपस्थित होते.
विशेष म्हणजे, राशीद खानने त्याच्या नात्यातील मुलीसोबतच लग्न केल्याचे वृत्त आहे. पण आतापर्यंत समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये राशिदची पत्नी दिसत नाही किंवा तिच्याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
दरम्यान, राशीदने चाहत्यांना दिलेले एक वचन मोडल्याचे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. २०२० च्या एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की, अफगाणिस्तान विश्वचषक जिंकल्यानंतरच आपण लग्न करणार आहोत."
राशीदने नातेवाईकाच्या कुटुंबात लग्न केल्याचेही वृत्त आहे. त्याचवेळी रशीदने लग्नासोबत चाहत्यांना दिलेले महत्त्वाचे वचन मोडले. २०२० मध्ये एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की, अफगाणिस्तानने विश्वचषक जिंकल्यानंतरच आपण लग्न करू.
राशीद खानवर शुभेच्छांचा वर्षाव- दरम्यान राशीद खान एवढ्यात लग्न करेल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. अशा परिस्थितीत जेव्हा त्याच्या लग्नाचे फोटो आले तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, मात्र त्याच्या चाहत्यांनी या मिस्ट्री स्पिनरवर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आणि त्याच्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या.