Ranveer Singh Upcoming Movies: रणवीर सिंग बॉलिवूडचा ब्लॉकबस्टर अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत, पण त्याचे काही सिनेमे असे आहेत की चाहते त्यांची आतुरतेने वाट पाहत असतात.
(1 / 8)
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी चित्रपटांच्या यादीमध्ये काही असे चित्रपट आहेत ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटांचे चित्रीकरण सुरु होते. चला पाहूया हे सिनेमे कोणते…
(2 / 8)
मुकेश खन्ना यांच्या 'शक्तिमान' या सुपरहिरो चित्रपटाबाबत गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरु आहे. रणवीर सिंग शक्तीमानच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या अनेक बातम्या या दरम्यान येत आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
(3 / 8)
दक्षिणेच्या ब्लॉकबस्टर हिट चित्रपटाचा हिंदी रिमेक देखील रणवीर सिंगच्या आगामी चित्रपटांमध्ये समाविष्ट आहे. वेलपरी नावाच्या या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
(4 / 8)
लवकरच रणवीर सिंगच्या कॉप युनिव्हर्समधला 'सिंघम अगेन' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग अजय देगन, टायगर श्रॉफ आणि दीपिका पदुकोण दिसणार आहे.
(5 / 8)
फरहान अख्तरने बऱ्याच चर्चेनंतर अखेर रणवीर सिंगला डॉन-३ चित्रपटातील डॉनच्या भूमिकेसाठी कास्ट केले आहे. शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांनी साकारलेली व्यक्तिरेखा रणवीर कोणत्या नव्या स्तरावर नेईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
(6 / 8)
रणवीर सिंग आणि संजय लीला भन्साळी यांनी जेव्हा जेव्हा हातमिळवणी केली तेव्हा त्यांनी ब्लॉकबस्टर हिट चित्रपट दिले आहेत. 'बाजीराव मस्तानी' असो की 'पद्मावत', आता भन्साळी रणवीरसोबत 'बैजू बावरा' नावाचा चित्रपट करण्याचा विचार करत आहेत.
(7 / 8)
चाहते रोहित शेट्टीच्या 'सिम्बा २' या 'कॉप युनिव्हर्स' चित्रपटाचीही आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात रणवीर पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.