८०च्या दशकात दूरदर्शन वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या 'रामायण' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली होती. या मालिकेत राम, लक्ष्मण आणि सीता ही भूमिका साकारणारे कलाकार प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले होते. आता मालिकेत राम ही भूमिका साकारणारा कलाकार चर्चेत आहे.
राम ही भूमिका अभिनेता अरुण गोविल यांनी साकारली होती. आता अरुण गोविल हे लोकसभा निवडणुक लढणार आहेत.
भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यात अरुण गोविल यांचे नाव आहे. आता अरुण गोविल यांच्याकडे एकूण किती संपत्ती आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.