Muslims gather to pray in NewYork Times Square : पवित्र रमजान महिन्याची सुरूवात सोमवार पासून झाली आहे. हा पवित्र महिना साजरा करण्यासाठी न्यू यॉर्क येथील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअर येथे हजारोच्या संख्येने एकत्र येत मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले.
(1 / 8)
जगभरातील मुस्लिम रमजान पाळतात. हा महिना जगभरात साजरा केला जात आहे. (AFP)
(2 / 8)
अमेरिकेत हजारो मुस्लिम नागरिक न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरमध्ये रमजानच्या पहिल्या तरावीह प्रार्थनेसाठी जमले होते. (AFP)
(3 / 8)
दररोज सूर्यास्तापर्यंत उपवास करून (सॉम) आणि प्रार्थना (सालाह) करून साजरा केला जातो.(AFP)
(4 / 8)
कडाक्याची थंडी, वादळी वातावरण असतानाही प्रार्थना सभेसाठी मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव एकत्र जमले होते. (AFP)
(5 / 8)
एकत्र नमाज पठण करत रमजान महिन्याला सुरुवात करण्यात आली. (AFP)
(6 / 8)
रमजान महिन्यात पहाटेपासून संध्याकाळपर्यंत उपवास केला जातो. हा उपवास संध्याकाळी कुटुंब आणि मित्रांसह एकत्र येऊन सोडला जातो. (AFP)
(7 / 8)
रमजान हा प्रार्थनेचा महिना देखील आहे, ज्या दरम्यान मुस्लिम पारंपारिकपणे मशिदींमध्ये मोठ्या संख्येने जमत एकत्र नमाज पठण करतात. (AFP)
(8 / 8)
या ठिकाणी आयोजकांनी कुराणातील प्रार्थना एका पांढऱ्या मोठ्या स्क्रीनवर प्रक्षेपित केली होती. याचे पठण करत नागरिकांनी नमाज पठण केले. (AFP)