राम मंदिराची 'प्राण प्रतिष्ठा' सोहळा हा २२ जानेवारी रोजी होणार आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या भव्य सोहळ्याला अवघा एक दिवस बाकी असताना, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने नव्याने बांधलेल्या मंदिराला आकर्षक सजावट केली असून याचे फोटो ट्विटरवर पोस्ट करण्यात आले आहेत.
(PTI)अयोध्येतील या मेगा इव्हेंटसाठी अवघा एक दिवस बाकी असताना, संपूर्ण देश राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहे.
(X/@ShriRamTeerth)ट्रस्टने रविवारी जाहीर केले की 'प्राण प्रतिष्ठा' सोहळा 'मंगल ध्वनी' नावाच्या एका दिमाखदार संगीत कार्यक्रमाद्वारे सुरू केला जाणार आहे.
(X/@@ShriRamTeerth)ट्रस्टने असेही म्हटले आहे की रविवारी ११४ कलशांच्या पाण्याने मूर्तीचे स्नान करण्यात येईल.
(X/@ShriRamTeerth)शनिवारी भव्य अयोध्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर प्रभू रामाच्या बालपनाचे पोस्टर लावण्यात आले.
(X/@ShriRamTeerth)शुक्रवारी 'जय श्री राम'च्या जयघोषात राम मंदिराच्या 'गर्भ गृहात' राम लल्लाची मूर्ती शुक्रवारी ठेवण्यात आली होती.
(X/@ShriRamTeerth)