अयोध्या येथील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'प्राण प्रतिष्ठेचे; विधी केले जाणार आहेत. तर लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या नेतृत्वाखालील पुजाऱ्यांचे पथक मुख्य विधींचे निरीक्षण करणार आहेत. भव्य सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. यामुळे अयोध्या नगरी ही उजळून निघाली आहे.
(ANI)अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यापूर्वी नवकुंडांमध्ये स्थापन होत असलेल्या 'आर्णी'मधून दिसणारी आग.
(PTI)अयोध्येत अभिषेक सोहळ्यापूर्वी राम मंदिर फुलांनी सजवले जात आहे. भगवान रामप्रती आपली भक्ती व्यक्त करण्यासाठी देशभरातील भाविक या कामात योगदान देत आहेत.
(PTI)अयोध्या मंदिरात अभिषेक सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. याची जय्यत तयारी अयोध्येत सुरू आहे.
(PTI)अयोध्येतील प्रभू रामाच्या भव्य मंदिराच्या उद्घाटनापूर्वी सरयू नदीच्या काठावर यात्रेकरूंसाठी बांधलेल्या तंबूनगरीत हिंदू भाविक पोहोचले.
अयोध्येतील भगवान रामाच्या भव्य मंदिराच्या उद्घाटनापूर्वी सरयू नदीच्या काठावर यात्रेकरूंसाठी बांधलेल्या टेंट सिटीमध्ये भगवान हनुमानाचा पोशाख घातलेला एक हिंदू भाविक भक्तांसोबत नाचत असतांना.
अयोध्येतील प्रभू रामाच्या भव्य मंदिराच्या उद्घाटनापूर्वी सरयू नदीच्या काठावर यात्रेकरूंसाठी बांधलेल्या टेंट सिटीमध्ये हिंदू भाविक प्रार्थना करत असतांना.
अयोध्या, येथे १९ जानेवारी रोजी 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्यापूर्वी 'राम की पेडी' येथे लेझर शो पाहण्यासाठी जमलेले भाविक.