अयोध्येतील राम मंदिर अभिषेक कार्यक्रमाच्या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या साठी आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करण्यात आला आहे. धर्मपथ, राम पथ येथे भाविकांची सर्वाधिक वर्दळ असते. तसेच हनुमानगढ़ी परिसरातील बायलेन्स आणि अशरफी भवन रस्त्यासह विविध भागात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
(HT Photo/Deepak Gupta)अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराच्या अभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला रामजन्मभूमीजवळ मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
(HT Photo/Deepak Gupta)संपूर्ण अयोध्येतील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य सरकारने नाईट व्हिजन उपकरण (NVDs) आणि १० हजाराहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे शहरात बसवले आहेत.
(PTI)कार्यक्रमाच्या ठिकाणी, १० हजार सीसीटीव्ही कॅमेरे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेने सुसज्ज ड्रोन लोकांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवत आहेत, तर साध्या वेशातील पोलिस अतिरिक्त सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.
(HT Photo/Deepak Gupta)उत्तर प्रदेश दहशतवादी विरोधी पथक (ATS) च्या जवानांनी शनिवारी अयोध्येत गस्त घातली.
(HT Photo/Deepak Gupta)"मंदिर शहरातील सुरक्षा वाढविण्याच्या एकत्रित प्रयत्नांचा एक भाग म्हणून, अयोध्या आता कृत्रिम बुद्धिमत्तेने सुसज्ज ड्रोन तैनात करण्यात आले आहे. या सोबतच भुसुरंग विरोधी ड्रोनचा वापर देखील केला जात आहे," एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
(REUTERS)AI-तंत्रज्ञानावर आधारित ड्रोन देखील संपूर्ण अयोध्येत पाळत ठेवत आहेत, तर भुसुरुंग विरोधी ड्रोन देखील जमिनी खालील स्फोटकांसाठी तपासणी करण्यास सक्षम आहेत.
(HT Photo/Deepak Gupta)आज होणारा 'प्राण प्रतिष्ठा' सोहळा हा एक ऐतिहासिक सोहळा ठरणार आहे. यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था केली आहे. त्यासोबतच प्रत्येक रस्त्यावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात रेड झोन, यलो झोन टायर करण्यात आले आहे. तुय माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्था चोख ठेवण्यात येणार असल्याची माहिती महासंचालक प्रशांत कुमार यांनी दिली.
(AFP)