अयोध्या राम मंदिर सोहळ्यासाठी कांची कामकोटी पीठमचे जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वतीजी महाराज सोमवारी 'प्राण प्रतिष्ठे'पूर्वी अयोध्येत दाखल झाले आहेत.
(X/@ShriRamTeerth)राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला विविध साधू आणि व्हीव्हीआयपी अयोध्येत पोहोचले. योगगुरू राम देव बाबा देखील रविवारी अयोध्येत दाखल झाले.
(Deepak Gupta/HT Photo)साध्वी ऋतंभरा सोमवारी राम मंदिराच्या 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्यापूर्वी अयोध्येत पोहोचल्या.
(Deepak Gupta/HT Photo)अयोध्येतील हनुमान गढी मंदिरात प्रार्थना केल्यानंतर साधूंची मिरवणूक रामपथवर निघाली.
(Deepak Gupta/HT Photo)गायक-संगीतकार शंकर महादेवन राम मंदिराच्या 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अयोध्येत पोहोचले. ते म्हणाले, फक्त संपूर्ण देशच नाही तर संपूर्ण जग या क्षणाची वाट पाहत आहे. आम्ही खूप आनंदी आणि उत्साहित आहोत. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवण्यात आले याबद्दल आम्हाला धन्य वाटते. मला वाटते की भारताच्या इतिहासात घडलेली ही सर्वात मोठी घटना आहे.'
(ANI)जनसेना प्रमुख पवन कल्याण सोमवारी होणार्या अयोध्या राम मंदिराच्या ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्यापूर्वी लखनौला पोहोचले.
अभिनेता रणदीप हुडा हा पत्नी लिन लैश्रामसह, अयोध्येतील राम मंदिर 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी लखनौ विमानतळावर पोहचला.
(ANI)'प्राण प्रतिष्ठा' समारंभाच्या आधी अयोध्येत सेलिब्रिटी शेफ संजीव कपूर देखील पोहचले. “असे वातावरण असू शकते याची मी कल्पनाही केली नव्हती. पण खूप उत्सुकता, उत्साह आणि आनंद आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो असे, संजीव कपूर म्हणाले.
(ANI)अभिनेते रजनीकांत देखील सोमवारी ‘प्राण प्रतिष्ठा’ समारंभात सहभागी होण्यासाठी चेन्नई विमानतळावरून अयोध्येकडे रवाना झाले.
(ANI)अभिनेता धनुष सोमवारी राम मंदिराच्या ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्यात सहभागी होण्यासाठी चेन्नई विमानतळावरून अयोध्येकडे रवाना झाला.
(ANI)