(2 / 8)ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत हे एक असे सेलिब्रिटी आहेत, जे विविध मंदिरांना भेट देण्यासाठी प्रवास करत असतात. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी अध्यात्म का महत्वाचे आहे, याबद्दलही भाष्य केले होते. ते म्हणाले की, ‘संपूर्ण जगाला अध्यात्माची गरज आहे, कारण ही प्रत्येक माणसासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. आध्यात्मिक असणे म्हणजे शांतता अनुभवणे आणि मुळात यात देवावर विश्वास ठेवणे समाविष्ट आहे.’