उन्हाळा सुरु झाला की एप्रिल किंवा मे महिन्यात मुलांना शाळेला सुट्टी लागते. अनेक कुटुंबीय या दिवसांमध्ये फिरायला जातात. गरमी असल्यामुळे अनेकजण समुद्रकिनारी फिरायला जाण्याचे ठरवतात. पण समुद्र किनारी फिरायला गेल्यावर कोणते कपडे परिधान करावेत असा प्रश्न अनेकांना पडतो. चला जाणून घेऊया…
(Instagram/@rakulpreet)बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ही नुकतीच कुटुंबीयांसोबत फिरायला गेली आहे. तिने समुद्रकिनारी फिरतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोंमध्ये रकुलने प्रिंटेड बिकीनी परिधान केली आहे. त्यावर तिने जॅकेट घातले आहे.
(Instagram/@rakulpreet)तुम्ही कधी बिकीनीवर शर्ट घातले आहे का? रकुल प्रीत सिंहने नुकताच पोपटी रंगाची बिकीनी समुद्र किनारी परिधान केली होती. त्यावर तिने पोपटी रंगाचा शर्ट देखील परिधान केला आहे. रकुलचा हा हटके लूक सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
(Instagram/@rakulpreet)उन्हाळ्यात समुद्र किनारी रकुलने प्रिंटेड शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. त्यावर पांढरे शूज, मोकळे केस असा लूक रकुलने केला आहे. या लूकमध्ये रकुल अतिशय क्यूट दिसत आहे.
(Instagram)