Raksha Bandhan 2024 thane : ठाण्यातील हिंदू आणि मुस्लिम नागरिकांनी आज मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरे केले. ठाण्यात समाजात जातीय सलोखा टिकून रहावा, यासाठी शिवमुद्रा प्रबोधिनी या सामाजिक संस्थेकडून ठाणे महाजनवाडी हॉल खारकेर अली येथे हा आगळेवेगळे रक्षाबंधन साजरे केले. हिंदू महिलांनी मुस्लिम बांधवांना राखी बांधली व मुस्लिम महिलांनी हिंदू बांधवांना राखी बांधून हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश दिला. या सोहळ्यात पोलीस बांधव देखील सहभागी झाले होते.
Raksha Bandhan 2024 thane Update : जातीय सलोखा जपणारा हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा आज ठाण्यात पार पडला. यावेळी हिंदू भगिनींनी मुस्लिम बांधवांना तर मुस्लिम भगिनींनी हिंदू बांधवांना राखी बांधून हा सण उत्साहात साजरा केला. शिवमुद्रा प्रबोधिनी आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी रघुवंशी सभागृहात जातीय सलोख्या अंतर्गत हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातून हिंदू मुस्लिम एकोप्याचे दर्शन घडले.
Raksha Bandhan 2024 Thane : देशातील अनेक राज्यांमध्ये धार्मिक तणाव निर्माण होत असल्याच्या घटना समोर येत असताना ठाण्यातून दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. रक्षाबंधनानिमित्त सामाजिक संस्थेतर्फे हिंदू-मुस्लिम रक्षाबंधन साजरा करण्यात आला. यावेळी लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
Raksha Bandhan 2024 Update : हिंदू आणि मुस्लिम महिलांनी ठाणे पोलिसांना राख्या बांधल्या. यावेळी पोलिसांनी आपल्या बहिणींना सुरक्षेचं वचन दिलं. शहरातील शांतता आणि दोन्ही समाजातील शांतता टिकवण्यासाठी आगामी काळात असे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचं उपस्थितांकडून सांगण्यात आलं.
Raksha Bandhan 2024 News : लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते रक्षाबंधनाच्या चार दिवस आधीच पात्र महिलांच्या बँक खात्यावर जमा झाल्याने यावर्षीच्या रक्षाबंधन सणाचा आनंद द्विगुणीत झाला आहे. महिलांच्या चेहर्यावर एक विलक्षण आनंद दिसून येत आहे. तसेच बँकांमध्ये देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी तीन दिवसापासून महिलांची गर्दी दिसून येत आहे.
Raksha Bandhan 2024 : त्याचबरोबर एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सूट असल्याने बहुसंख्य महिलांनी रक्षाबंधनासाठी माहेरी जाण्याकरता लालपरीचीच निवड केली आहे. लाडक्या भाऊरायाला राखी बांधण्यासाठी महिलांनी माहेरची वाट धरली आहे. त्यामुळे एसटी बसमध्ये दोन दिवसापासून महिला भगिनींची तोबा गर्दी पहावयास मिळत आहे.