Raksha Bandhan : ‘या’ शुभ योग-संयोगात आणि मुहूर्तावर बांधा राखी, जाणून घ्या अचुक वेळ-raksha bandhan 2024 date shubh yog muhurta and auspicious time to tie rakhi ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Raksha Bandhan : ‘या’ शुभ योग-संयोगात आणि मुहूर्तावर बांधा राखी, जाणून घ्या अचुक वेळ

Raksha Bandhan : ‘या’ शुभ योग-संयोगात आणि मुहूर्तावर बांधा राखी, जाणून घ्या अचुक वेळ

Aug 06, 2024 09:41 PM IST
  • twitter
  • twitter
Raksha Bandhan 2024 Date And Time : रक्षाबंधन हा भाऊ-बहिणींमधील अतूट प्रेमाचा सण आहे, जो दरवर्षी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधते.  चला तर मग जाणून घेऊया पौर्णिमेच्या शुभ मुहूर्ताबद्दल.  
श्रावण महिन्यात अनेक महत्त्वाचे व्रते आणि सण होतात, त्यापैकी रक्षाबंधनही एक आहे. श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच नारळी पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. राखीबंधनाचा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया पौर्णिमेच्या शुभ मुहूर्ताबद्दल.  
share
(1 / 6)

कॅलेंडरनुसार रक्षाबंधनाचा  सण श्रावणातील पौर्णिमेला साजरा केला जातो. परंतु श्रावणातील राखीबंधनाच्या तारखेबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे १८ की १९ ऑगस्ट, कोणत्या दिवशी हा सण साजरा केला जाईल. तर पंचांगानुसार पौर्णिमा तिथी १९ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजून ४ मिनिटांनी सुरू होईल, जी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी संपेल.
share
(2 / 6)

अशा तऱ्हेने रक्षाबंधनाचा सण सोमवार, १९ ऑगस्ट रोजी देशभरात साजरा केला जाणार आहे. या दिवशी दुपारी १.३० नंतरचा काळ भावाच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी सर्वात शुभ काळ असेल.
share
(3 / 6)

दुपारी १.३०  ते ९:७  या वेळेत भावाला राखी बांधू शकता. कारण यावेळी भद्राची सावली राहणार नाही. भद्रा वगळता शुभ मुहूर्तावर राखी बांधावी, असे मानले जाते. त्यामुळे भद्रा दरम्यान राखी बांधू नका किंवा कोणतेही शुभ कार्य करू नका.
share
(4 / 6)

रक्षाबंधनाचा सण पूर्ण विधीने साजरा केला जातो. या दिवशी सकाळी सर्वप्रथम आंघोळ करावी आणि स्वच्छ किंवा नवीन कपडे घालावेत. त्यानंतर पूजाघरात देवाची पूजा करा. यानंतर शुभ मुहूर्तावर भावाच्या मनगटावर राखी बांधा.
share
(5 / 6)

आधी बहीण भावाच्या कपाळावर टिळा लावते, नंतर त्याच्या मनगटावर राखी बांधून त्याला मिठाई खाऊ घालते. यानंतर भाऊ आपल्या बहिणींना पैसे किंवा एखादी वस्तू भेट म्हणून देतो.
share
(6 / 6)

इतर गॅलरीज