Rajinikanth Looks : रजनीकांत हे केवळ आपल्या अभिनयासाठीच नव्हे तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठीही ओळखले जातात. या दिग्गज अभिनेत्याचा जन्म 12 डिसेंबर रोजी झाला. त्यांनी १७०हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
(1 / 9)
रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी झाला होता. एकापाठोपाठ एक चित्रपटांद्वारे त्यांनी सातत्याने रसिकांचे मनोरंजन केले आहे.
(2 / 9)
प्रत्येक चित्रपटात त्यांनी आपापल्या शैलीत वेगवेगळ्या पद्धतीने अभिनय केला आहे.
(3 / 9)
हे दोन्ही फोटो रजनीकांत यांचेच आहेत का? असा प्रश्न नक्कीच पडेल. पडद्यावर आणि खऱ्या आयुष्यात रजनीकांत अगदीच वेगळे दिसत आहेत.
(4 / 9)
वय वर्षे ७५ असूनही, अजूनही ते अॅक्शन चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून दिसतात.
(5 / 9)
रजनीकांत यांचा मोठा चाहता वर्ग असून, त्यांचे चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाले आहेत.
(6 / 9)
त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक टप्पे गाठले आहेत आणि आजही ते चित्रपट क्षेत्रात सक्रिय आहेत.
(7 / 9)
लोकांची मने जिंकणारा रिअल लाईफ हिरो म्हणून अनेक चाहते त्यांचे कौतुक करतात. रजनीकांत अभिनयासोबतच अध्यात्मात देखील रमतात.
(8 / 9)
ते त्यांच्या स्टाईल आणि प्रेमळ वागणुकीसाठी ओळखले जातात. त्यांना सगळे प्रेमाने ‘थलायवा’ या नावाने ओळखतात.
(9 / 9)
तरुणांनी मेहनत घेतली तर कोणत्याही प्रकारचे यश मिळवणे कठीण नाही, यांचे उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेते रजनीकांत.
(10 / 9)
रजनीकांत यांची पहिली नोकरी बस कंडक्टर होती. हे कदाचित सर्वांनाच माहित आहे, पण, आज ते एक यशस्वी अभिनेता म्हणून उदयास आले आहेत.