CSK vs RR IPL 2023 : अखेरच्या चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जचा पराभव झाला आहे.
(1 / 6)
Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live Score : राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्जमध्ये झालेल्या सामन्यात संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्स संघाने बाजी मारली आहे.(AFP)
(2 / 6)
अखेरच्या षटकात चेन्नईला विजयासाठी २१ धावांची गरज होती. संदीप शर्माच्या पहिल्या पाच चेंडूवर धोनी-जडेजाने १८ धावा केल्या. अखेरच्या चेंडूवर धोनीला बाउंड्री न मारता आल्यामुळं सीएसकेचा पराभव झाला आहे.(AFP)
(3 / 6)
यंदाच्या आयपीएलमधील हा सीएसकेचा दुसरा पराभव आहे.(AFP)
(4 / 6)
राजस्थानने यंदाच्या आयपीएलमध्ये तिसरा विजय मिळवत चषकावर दावा ठोकला आहे. राजस्थानकडून जोस बटलरने अर्धशतकीय खेळी केली. त्यानंतर हेटमायर आणि आश्विनने फटकेबाजी करत संघाला दीडशेपार स्कोर उभारून दिला.(IPL Twitter)
(5 / 6)
डावाची चांगली सुरुवात करूनही राजस्थानला मोठा स्कोर उभारता आलेला नव्हता. राजस्थानने चेन्नईला १७६ धावांचं लक्ष्य दिलं होतं.(AP)
(6 / 6)
डेव्होन कॉन्वेने अर्धशतकीय खेळी केल्यानंतर धोनी आणि जडेजाने विस्फोटक फलंदाजी करत संघाला विजयाजवळ नेलं, परंतु अखेरच्या चेंडूवर सीएसकेला पराभव स्वीकारावा लागला.(AP)