बॉलिवूड अभिनेते राज कपूर यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त कपूर कुटुंबीय एका चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. १३ ते १५ डिसेंबर दरम्यान ४० शहरांतील १३५ चित्रपटगृहांमध्ये राज कपूर यांचे १० सुपरहिट सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहेत. राज कपूर यांनी यापैकी काही चित्रपटांमध्ये काम केले आणि काही चित्रपटांचे दिग्दर्शन केले. या यादीत कोणते सिनेमे आहेत चला पाहूया.…
आग या चित्रपटात राज कपूर, नर्गिस आणि कामिनी कौशल यांच्या भूमिका आहेत. चित्रपटात, नायकाच्या वडिलांची इच्छा आहे की त्याने वकील व्हावे पण त्याचे पहिले प्रेम अभिनय असते.
बरसात हा राज कपूर आणि नर्गिस यांचा चित्रपट आहे. हा चित्रपट एका खेड्यातील मुलीची कथा आहे जी शहरातील मुले प्राण आणि गोपाल यांच्या प्रेमात पडते. शहरात परतल्यानंतर गोपाल इतर मुलींसोबत फ्लर्ट करतो. पण प्राण गावातील मुलीला विसरू शकत नाही.
आवारा चित्रपटात राज कपूर आणि नर्गिस यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाची कथा एका गरीब मुलाची आहे जो आपल्या आईचे पोट भरण्यासाठी गुन्हेगार बनतो. जेव्हा रीटा त्याच्या आयुष्यात येते तेव्हा तो सुधारण्याचा निर्णय घेतो.
लहान शहरातील मुलगा जेव्हा मोठी स्वप्ने घेऊन शहरात जातो तेव्हा त्याला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, या कथानकाभोवती श्री ४२० हा चित्रपट फिरतो. राज कपूर आणि नर्गिस या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत होते.
राज कपूर आणि पद्मिनी यांच्या जिस देश में गंगा बहती है या चित्रपटाची कथा एका साध्या गायकाची आहे. ओढावलेल्या परिस्थितीमुळे हा गायक डाकूंच्या टोळीत सामील होतो आणि नंतर सुधारतो.
संगम हा राज कपूरचा ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. त्यावेळी या चित्रपटाने ४ कोटींची कमाई झाली होती. ही कथा एका वैमानिकाची आहे ज्याला युद्धात मृत समजले जाते. तो परत येतो आणि त्याच्या मैत्रिणीशी लग्न करतो. पण मैत्रीण त्याच्या जिवलग मित्राशी लग्न करण्याचा विचार करत असते.
जागते रहो चित्रपटात, एक गरीब तहानलेला शेतकरी पाण्याच्या शोधात मोठ्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश शिरतो. लोक त्याला चोर समजतात. पळून जाण्यासाठी, तो अनेक घरांमध्ये लपतो. त्यावेळी त्याला घरात राहणाऱ्या लोकांचे सत्य कळते.
मेरा नाम जोकर या चित्रपटात कथा आहे सर्कसचा जोकर राजूची. त्याच्या आयुष्यातील तीन पानांची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
बॉबी ही वेगवेगळ्या वर्गातील दोन किशोरवयीन मुलांची प्रेमकथा आहे. यात ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया मुख्य भूमिकेत आहेत.