भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. मात्र, या सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
(1 / 5)
बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताची नजर २-० अशी मालिका जिंकण्यावर आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळला. तर, दुसऱ्या कसोटी सामन्याला येत्या २७ सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे.(AFP)
(2 / 5)
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.भारतीय संघ कानपूर येथे पोहोचला आहे.
(3 / 5)
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कानपूर येथे खेळला जाणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शनिवारी कानपूरमध्ये पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
(4 / 5)
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कानपूरमध्ये २८ सप्टेंबर म्हणजेच भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी पावसाची शक्यता आहे. पुढे पावसाची शक्यता नाही. पण पुढील दोन दिवस पावसामुळे खेळ प्रभावित होण्याची शक्यता आहे.
(5 / 5)
चेन्नईच्या चेपाक स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने बांगलादेशचा २८० धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.(PTI)