मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mumbai Weather Update : मुंबईत पावसाचा हायअलर्ट! पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाने दिला ऑरेंज अलर्ट

Mumbai Weather Update : मुंबईत पावसाचा हायअलर्ट! पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाने दिला ऑरेंज अलर्ट

Jun 23, 2024 07:31 AM IST
  • twitter
  • twitter
  • Mumbai Weather Update : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. आज अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत शनिवारी रात्री पासून जोरदार पाऊस सुरू आहे. आज मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, या पावसामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
हवामान विभागाने आज राज्यात कोकण, मुंबई, पालघर, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी यलो तर काही ठिकाणी  ऑरेंज तर काही ठिकाणी रेड अलर्ट जारी  केला आहे.   नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या आगमनामुळे उत्तरेकडील मैदानी भागात सुरू असलेली उष्णतेची लाट कमी होऊन मध्य भारतात लक्षणीय पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शनिवारी रात्रीपासून पावसाने मुंबईत हजेरी लावली आहे. 
share
(1 / 6)

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथे पावसाने जोरदार हजेरी लावली. ठाण्यात जोरदार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी कोसळली तर काही ठिकाणी  भिंत कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. ठाणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांपासून ठाणे अग्निशमन दलाला बचावकार्याचा ओघ सुरू आहे. त्यांनी आगीच्या दोन घटनांना प्रतिसाद दिला आणि झाडे पडल्याच्या ४२ घटना हाताळल्या.
share
(2 / 6)

मुंबई शहर आणि उपनगरात मधूनमधून मध्यम ते जोरदार पाऊस मेघगर्जनेसह बरसण्याचा अंदाज आहे. इथे आज सामान्यतः ढगाळ आकाश राहील. तर, कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२ °C आणि २६°C च्या आसपास असेल. शनिवारी सायंकाळी मुंबईच्या काही भागात पावसाने हजेरी लावल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाला.
share
(3 / 6)
मुंबई शहर आणि उपनगरात मधूनमधून मध्यम ते जोरदार पाऊस मेघगर्जनेसह बरसण्याचा अंदाज आहे. इथे आज सामान्यतः ढगाळ आकाश राहील. तर, कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२ °C आणि २६°C च्या आसपास असेल. शनिवारी सायंकाळी मुंबईच्या काही भागात पावसाने हजेरी लावल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाला.(PTI)
ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने (आरडीएमसी) दिलेल्या माहितीनुसार, २१ जून रोजी रात्री ११ वाजून ४२ मिनिटांनी ठाण्यातील फुटबॉल मैदानात खेळत असलेल्या १७ मुलांपैकी सहा मुले मैदानात शेड कोसळून जखमी झाली.
share
(4 / 6)
ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने (आरडीएमसी) दिलेल्या माहितीनुसार, २१ जून रोजी रात्री ११ वाजून ४२ मिनिटांनी ठाण्यातील फुटबॉल मैदानात खेळत असलेल्या १७ मुलांपैकी सहा मुले मैदानात शेड कोसळून जखमी झाली.(PTI)
पुढील काही दिवसांत केरळ, किनारपट्टी आणि दक्षिण आंतरिक कर्नाटक, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने
share
(5 / 6)
पुढील काही दिवसांत केरळ, किनारपट्टी आणि दक्षिण आंतरिक कर्नाटक, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने(PTI)
हवामान खात्याने आज कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याने प्रशासणाने आपत्ती निवारण तुकड्या तैनात केल्या असून त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
share
(6 / 6)
हवामान खात्याने आज कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याने प्रशासणाने आपत्ती निवारण तुकड्या तैनात केल्या असून त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. (PTI)
इतर गॅलरीज