Mumbai Rail: मुंबईतील 'हे' ९ रेल्वे स्टेशन्स होणार चकचकीत; डिझाइन्स पाहून विश्वासच नाही बसणार
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mumbai Rail: मुंबईतील 'हे' ९ रेल्वे स्टेशन्स होणार चकचकीत; डिझाइन्स पाहून विश्वासच नाही बसणार

Mumbai Rail: मुंबईतील 'हे' ९ रेल्वे स्टेशन्स होणार चकचकीत; डिझाइन्स पाहून विश्वासच नाही बसणार

Mumbai Rail: मुंबईतील 'हे' ९ रेल्वे स्टेशन्स होणार चकचकीत; डिझाइन्स पाहून विश्वासच नाही बसणार

Feb 21, 2024 09:18 PM IST
  • twitter
  • twitter
मुंबईतील रेल्वे स्टेशन्स म्हणजे तोबा गर्दी. रेल्वे मंत्रालय यातील निवडक स्टेशन्सचा कायापालट करणार आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी केंद्राच्या ‘अमृत भारत स्टेशन योजने’अंतर्गत स्टेशनवर नवीन कार्यालये बांधणे, नवीन फलाट, टॉयलेट बांधणे, पिण्याच्या पाण्याचे नळ बसवणे आणि इतर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे.
भायखळा स्टेशन : स्टेशनवर पूर्वेकडील जुने बुकिंग कार्यालय पाडून नवीन बुकिंग कार्यालय बांधण्यात येणार आहे. येथे डिजिटल जाहिरात स्क्रीनसह फ्लोअरिंग आणि एसीपी क्लॅडिंग बदलण्यात येणार आहे. पश्चिम बाजुला नवे प्रवेशद्वार उभारण्यात येईल. प्लॅटफॉर्म लांब करून आणि दुरुस्ती, पेंटिंग करण्यात येईल. जुने विद्यमान शौचालये पाडून नवीन शौचालय बांधण्यात येणार आहे. कल्याण दिशेच्या टोकाच्या पश्चिमेला बहुमजली पार्किंग सुविधा उभारण्यात येणार आहे. या एकूण प्रकल्पाचा बांधकाम खर्च रुपये ३५.२५ कोटी रुपये अपेक्षित आहे. 
twitterfacebook
share
(1 / 9)

सँडहर्स्ट स्टेशन: मुंबईत मध्य आणि हार्बर मार्गावर सँडहर्स्ट स्टेशन हे अत्यंत गजबजलेलं स्टेशन आहे. येथे १६.३७ कोटी रुपये खर्चून आत्ताच्या कार्यालयाचे नवीनीकरण करण्यात येणार आहे. स्टेशन भवन बांधून कोटा आणि ग्रेनाइट लावणे. जाळी बदलणे, स्टेशन भवनापर्यंत पोहोचण्यासाठी नवीन रँप बाधणे आणि दिव्यांगजनांसाठी रँपवर आवरण प्रदान करण्याची कामे केली जाणार आहे.
twitterfacebook
share
(2 / 9)

चिंचपोकळी स्टेशन :चिंचपोकळी स्टेशनच्या मुख्य आणि मागील इमारतीच्या दर्शनी भागात सुधारणा करण्यात येणार आहे. फलाटांवरील सर्व पिण्याच्या पाण्याच्या नळांची दुरुस्ती करणे, सध्याच्या प्लॅटफॉर्मवर लादी बदलणे, विद्यमान बुकिंग कार्यालयाची दुरुस्ती आणि नूतनीकरण, पूर्व आणि पश्चिम प्रवेशद्वारांचे नूतनीकरण, अतिरिक्त नाल्या बांधून सांडपाणी व्यवस्था करणे इत्यादी कामे करण्यात येणार आहे. चिंचपोकळी स्टेशनच्या नवीनाकरणासाठी ११.८१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 
twitterfacebook
share
(3 / 9)

वडाळा रोड : वडाळा रोड स्थानकावर विद्यमान बुकिंग कार्यालयाचे नूतनीकरण आणि नवीन अपंगांसाठी नवीन बुकिंग काउंटर आणि अधिक एटीव्हीएम मशीन नवीन गेट, एसीपी शीट आणि एलईडी दिवे असलेले बुकिंग ऑफिस उभारण्याचा प्रस्ताव आहे. येथे फलाट क्रमांक २ आणि ३ येथील विद्यमान जीआरपी इमारतीची दुरुस्ती करण्यात येणार आहे.   फलाटावर विद्यमान कुपनलिका पाईप्स बदलण्याचा प्रस्ताव असून या प्रकल्पासाठी एकूण खर्च २३.०२ कोटी रुपये अपेक्षित आहे.
twitterfacebook
share
(4 / 9)

माटुंगा स्टेशन : स्टेशनवर फलाट क्रमांक ३/४ वर प्लॅटफॉर्मची उभारणी करणे, स्टेशनमध्ये प्रवेश करण्यासाठी फुटपाथ सुधारणे आणि कलात्मक कंपाउंड भिंत उभारण्याचा प्रस्ताव आहे. यात एसीपी क्लॅडिंग बदलणे, अभिसरण क्षेत्राचे लँडस्केपिंग करणे, मागील स्थानक इमारत आणि अभिसरण जागा सुधारणे तसेच प्लॅटफॉर्मवरील विद्यमान कव्हरची दुरुस्ती आणि पुन्हा पेंटिंगचा प्रस्ताव आहे. यासाठी एकूण प्रकल्प खर्च रुपये १७.२८ कोटी प्रस्तावित आहे.
twitterfacebook
share
(5 / 9)

कुर्ला स्टेशन: येथे विद्यमान बुकिंग कार्यालयाचे नूतनीकरण करून अपंगांसाठी अनुकूल अशी तिकीट खिडकी बांधण्यात येणार आहे. स्टेशनच्या पूर्वेकडील नवीन मुख्य प्रवेश/एक्झिट गेटचे बांधकाम करण्यात येणार आहे. फलाटाच्या शीटवरील जुने कव्हर बदलणे, खराब झालेल्या प्लॅटफॉर्मच्या पृष्ठभागाची दुरुस्ती, प्लॅटफॉर्म स्तंभांवर कव्हरवर एसीपीची तरतूद, अधिक सार्वजनिक जागा निर्माण करण्यासाठी स्टेशन इमारतीच्या अंतर्गत जागेचे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी २१.८१ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. 
twitterfacebook
share
(6 / 9)

विद्याविहार स्टेशन :या स्टेशनमध्ये एकूण ५ एंट्री पॉईंट्स आहेत. या सर्व एंट्री पॉइंट्समध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. या स्टेशनवर दोन एस्केलेटर बसवण्याची तरतूद आहे. सध्याच्या टॉयलेटचे नूतनीकरण आणि वेटिंग एरिया निर्माण करण्यात येणार आहे. मुंबई सीएसएमटीच्या दिशेने टोकावर ६.०० मीटर रुंद नवीन फूट ओव्हर पूल बांधण्याची तरतूद आहे. या संपूर्ण कामासाठी एकूण ३२.७८ कोटी रुपये प्रकल्प खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. 
twitterfacebook
share
(7 / 9)

दिवा स्टेशन :या स्टेशनसाठी प्रकल्प खर्च रुपये ४५.०९ कोटी ठेवण्यात आला आहे. यास्टेशनवर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेच्या टोकावर १२ मीटर रुंद फूट ओव्हर ब्रिज बांधण्याची तरतूद आहे. पूर्वेकडील दिशेने नवीन बुकिंग कार्यालय बांधण्यात येणार आहे. आरसीसी कंपाउंड वॉल बांधणे, अप्रोच रोडची सुधारणा करणे, प्लॅटफॉर्म सर्फेसिंगची दुरुस्ती, प्लॅटफॉर्म कॉलम्सवरील कव्हरवर नवीन एसीपी क्लेडिंग, फिरण वृक्षारोपण करून विद्यमान वेटिंग हॉल आणि शौचालयांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.
twitterfacebook
share
(8 / 9)

टिटवाळा स्टेशन : या स्टेशनवर नवीन १२ मीटर पादचारी पूल बांधण्यात येणार असून विद्यमान ६ मीटर फूट ओव्हर ब्रिज नवीन १२ मीटर पादचारी पूलाला जोडण्यात येणार आहे. टिटवाळा स्टेशनवरील सर्व प्लॅटफॉर्मची उंची १५० मिमी पर्यंत वाढविण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने फलाट १ आणि २ वर कव्हर-ओव्हर प्लॅटफॉर्मची तरतूद आहे. स्टेशनवर ३ टॉयलेट बांधण्यात येणार आहे. पूर्वेकडील बुकिंग ऑफिस आणि मेडिकल स्टोअरचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. प्रकल्प खर्च: रु. २५.०५ कोटी अपेक्षित आहे.
twitterfacebook
share
(9 / 9)

इतर गॅलरीज