Pune Railway fire : पुणे स्थानकात यार्डमध्ये उभ्या असलेल्या रेल्वेच्या एका डब्ब्याला रात्री २ च्या सुमारास भीषण आग लागली. ही आग नेमकी कशी लागली हे समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी जात आगीवर नियंत्रण मिळवले.
(1 / 6)
पुणे रेल्वे स्थानकात क्वीन्स गार्डनच्या शेजारी यार्डमध्ये उभ्या असलेल्या रेल्वेच्या स्लिपर कोचच्या डब्ब्याला मध्यरात्री भीषण आग लागली.
(2 / 6)
ही आग ऐवढी भीषण होती की, आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात हवेत होते. या घटनेमुळे रेल्वे प्रशासानाची मोठी धावळप उडाली.
(3 / 6)
या घटनेची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली. अग्निशामक दलाचे चार बंब घटनास्थळी रवाना झाले. त्यांना बऱ्याच दिवसंपासून स्थानकात उभ्या असलेल्या रेल्वेच्या एका डब्ब्याला मोठी आग लागल्याचे निदर्शनास आले.
(4 / 6)
अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने आग विझवण्यास सुरुवात केली. या घटनेत रेल्वेचे आणखी दोन डब्बे जळाले.
(5 / 6)
सुमारे तासाभरा नंतर ही आग विझवण्यात अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांन यश आले. या घटनेत सुदैवाने जीवित हानी अथवा जखमी झाले नाही.
(6 / 6)
ही आग नेमकी कशी लागली हे समजू शकले नाही. रेल्वे अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत.