मंगळवारी सायंकाळच्या सुमारास राहुल गांधींनी जुन्या दिल्लीतील ‘मोहब्बत का शरबत’ दुकान व बंगाली मार्केटमध्ये जाऊन स्ट्रीट फूटचा आस्वाद घेतला.
राहुल गांधी मंगळवारी सायंकाळी जुन्या दिल्लीतील मोहब्बत की शरबत दुकानासमोर जाऊन थांबले. भर बाजारात राहुल गांधींना पाहून लोकांची गर्दी जमा झाली. राहुल यांनी तेथे उपस्थित लोकांशी संवाद साधला.
राहुल गांधी यांनी निळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता. राहुल गांधी बंगाली मार्केटमध्ये गेले. राहुल गांधींनी पाणीपुरी, मटर चाट व बंगाली आलू टिक्की या पदार्थांचा आस्वाद घेतला.