राहुल गांधी यांनी अशोक नगर येथील बेरोजगार तरुणांची भेट घेतली. यावेळी त्यांनी स्वतः त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
हैदरबादमधील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, "आज मी हैद्राबादच्या अशोकनगरमध्ये विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना भेटलो. त्यांना पाहून मी भारावून गेलो. राज्याचा दर्जा मिळून दहा वर्षे झाली, तरी त्यांच्या आकांक्षा पूर्ण झालेल्या नाहीत.
"केसीआर यांच्या दहा वर्षांच्या राजवटीत तेलंगणातील तरुणांना न्याय मिळाला नाही. अधिसूचना नसणे, न्यायालयीन प्रकरणे आणि पेपरफुटीमुळे ३० लाख बेरोजगार तरुणांचे हाल झाले आहेत. तेलंगणात, ज्यासाठी ते लढले आहेत, त्यांची दुर्दशा झाली आहे. म्हणूनच त्यांची स्वप्ने साकार व्हावीत यासाठी काँग्रेस पक्षाने तयार केलेले जॉब कॅलेंडर दाखवून मी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला,” असे राहुल गांधी म्हणाले.
तेलंगणात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर एका वर्षाच्या आत 2 लाख नियुक्त्या पूर्ण करून तरुणांना दिलेले वचन पाळणार असल्याचे राहुल गांधींनी स्पष्ट केले आहे.
राहुल गांधी आरटीसी क्रॉस रोडवरील बावर्ची या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्येही गेले. तिथल्या अनेकांना राहुल गांधींना भेटण्याची इच्छा होती. राहुल गांधींसोबत अनेकांनी फोटो काढले.