Bharat Jodo Yatra : राहुल गांधी सुवर्ण मंदिरात नतमस्तक, भगव्या पगडीतील फोटो व्हायरल
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Bharat Jodo Yatra : राहुल गांधी सुवर्ण मंदिरात नतमस्तक, भगव्या पगडीतील फोटो व्हायरल

Bharat Jodo Yatra : राहुल गांधी सुवर्ण मंदिरात नतमस्तक, भगव्या पगडीतील फोटो व्हायरल

Bharat Jodo Yatra : राहुल गांधी सुवर्ण मंदिरात नतमस्तक, भगव्या पगडीतील फोटो व्हायरल

Published Jan 10, 2023 07:47 PM IST
  • twitter
  • twitter
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा हरियाणामधून पंजाबमध्ये दाखल झाली. पंजाबमध्ये दाखल होताच राहुल गांधी यांनी अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात जाऊन माथा टेकला. यावेळी राहुल गांधींनी भगव्या रंगाची पगडी परिधान केली होती. राहुल यांचे सुवर्ण मंदिरातील काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
राहुल गांधी यांनी अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी राहुल गांधी वाढलेल्या दाढीमध्ये व डोक्यावर भगवी पगडी परिधान केलेल्या वेशभुषेत दिसले.
twitterfacebook
share
(1 / 5)

काँग्रेसची भारत जोड यात्रा हरियाणातील शंभू सीमेवरुन पंजाबमध्ये दाखल झाली. त्यानंतर राहुल गांधी कारने चंदीगडला पोहोचले, त्यानंतर ते विशेष विमानाने अमृतसरला पोहोचले.
twitterfacebook
share
(2 / 5)

राहुल गांधींनी सुवर्ण मंदिरातील सुरू असलेल्या कीर्तनात बसून गुरुवाणी ऐकली. ब्लू स्टार ऑपरेशननंतर पहिल्यांदाच गांधी कुटुंबातील व्यक्ती सुवर्ण मंदिरात कीर्तन ऐकण्यासाठी बसली आहे. सुमारे २० मिनिटे राहुल गांधी सुवर्ण मंदिरात होते.
twitterfacebook
share
(3 / 5)

काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी ट्वीट केले होते की, 'भारत जोडो यात्रेचा आज ११६ वा हरियाणा राज्यातील अंबाला येथे पूर्ण झाला. बुधवारी अमृतसरमधील पवित्र सुवर्ण मंदिरात माथा टेकवल्यानंतर यात्रा सुरू होईल. राहुल गांधी मगंळवारी सुवर्ण मंदिरात जाणार असल्याने मंगळवारी दुपारनंतर पदयात्रा होणार नाही. यापूर्वीही राहुल गांधी केरळमध्ये पादरी आणि मध्य प्रदेशमध्ये मंदिरात दर्शनासाठी गेले होते.
twitterfacebook
share
(4 / 5)

विशेष म्हणजे पंजाबमध्ये काँग्रेसने नुकतीच सत्ता गमावली आहे. २०२२ मध्ये झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेतली होती. म्हटले जात होते की, माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील संघर्षामुळे पक्षाला नुकसान सोसावे लागले. 
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज