Rahul Gandhi In Karnataka : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज कर्नाटकात महिलांशी संवाद साधत प्रचार मोहिम संपवली.
(HT)Karnataka Election : बंगळुरुच्या बीएमटीसी बसमधून सामान्य माणसा प्रमाणे प्रवास करत राहुल गांधी यांनी महिलांशी गप्पा मारल्या.
(HT)बसमध्ये प्रवास करत असताना राहुल गांधींनी एका वयस्कर महिलेशी चर्चा केल्यानंतर त्यांच्यासोबत फोटो काढला.
(HT)भारत जोडो यात्रा संपल्यानंतर देखील राहुल गांधी हे अनेक कार्यक्रमांमध्ये पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घालताना दिसत आहे.
(PTI)राहुल गांधी यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या आणि डीके शिवकुमार हे देखील उपस्थित होते.
(PTI)प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राहुल गांधी यांनी महिलांसह तरुणींसोबतही राजकीय विषयांवर चर्चा केली.
(PTI)मतदानाच्या काही तासांपूर्वीच राहुल गांधींनी महिला मतदारांशी चर्चा करत पाठिंब्यासाठी साद घातल्याचं दिसून येत आहे.
(PTI)बसमध्ये प्रवास करत असताना राहुल गांधी यांनी महिलांना जागा देत स्वत: उभं राहून प्रवास केल्याचं पाहायला मिळालं.
(PTI)