काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी (National Herald Case) चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. ते कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेत्यांसोबत चालतच पक्षाच्या कार्यालापासून ईडी कार्यालात गेले. यावेळी प्रियांका गांधीही (Priyanka Gandhi) त्यांच्यासोबत होत्या.
(फोटो - पीटीआय)राहुल गांधींना ईडीचे समन्स आल्याच्या विरोधात काँग्रेसकडून आंदोलन केले जात आहे. त्यापार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेस मुख्यालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
(फोटो - पीटीआय)ईडीच्या समन्सविरोधात आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना दिल्लीत पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून पुष्पा स्टाइल 'झुकेंगा नही..' म्हणत घोषणाबाजी करण्यात आली.
(फोटो - पीटीआय)आम्ही घाबरणार नाही, आम्ही लढत राहू असं म्हणत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोस्टर्स हातात घेऊन विविध ठिकाणी आंदोलन केलं.
(फोटो - पीटीआय)राहुल गांधींच्या चौकशीच्या पार्श्वभूमीर ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला आहे.
(फोटो - पीटीआय)ईडी कार्यालयाबाहेर कोडीकुन्नील सुरेश यांनी आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी त्यांना तिथून बाजूला हटवले.
(फोटो - पीटीआय)ईडी कार्यालयात जाण्याआधी राहुल गांधी हे काँग्रेस मुख्यालयात गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधीसुद्धा होत्या.
(फोटो - पीटीआय)काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्यानं काँग्रेस मुख्यालयाच्या आवारात दिल्ली पोलिसांनी कलम १४४ लागू केले आहे.
(फोटो - पीटीआय)