आज आपण अशाच ५ स्टार क्रिकेटर्सबद्दल जाणून घेणार आहोत, जे सामना सुरू होण्यापूर्वी काही विशिष्ट गोष्टी करायचे आणि त्यानंतर मैदानावर उतरायचे.
लसिथ मलिंगा- श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा जेव्हा जेव्हा गोलंदाजीदरम्यान, चेंडू टाकायचा तेव्हा त्याआधी तो नेहमी बॉलचे चुंबन घेत असे. असे केल्याने चेंडू योग्य जागी पडेल असा मलिंगाचा विश्वास होता.
राहुल द्रविड- दिग्गज फलंदाज राहुल द्रविड हा जेव्हा फलंदाजीसाठी तयार व्हायचा, तेव्हा तो नेहमी उजवा पॅड आधी बांधायचा.
स्टीव्ह वॉ- ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज स्टीव्ह वॉ जेव्हा जेव्हा मैदानात उतरायचा तेव्हा तो खिशात लाल रुमाल ठेवायचा. हा रुमाल त्याला त्याच्या आजीने भेट म्हणून दिला होता. वॉ हा रुमाल लकी वस्तू म्हणून ठेवत असे.
सचिन तेंडुलकर- क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याचेही नाव अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आहे. खरे तर सचिन फलंदाजीला मैदानात उतरण्यापूर्वी नेहमीच डावा पॅड पहिल्यांदा घालत असे.
अनिल कुंबळे- टीम इंडियाचा माजी दिग्गज लेग स्पिनर अनिल कुंबळे याने १९९९ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या दिल्ली कसोटीत दुसऱ्या डावात गोलंदाजी करण्यापूर्वी सचिन तेंडुलकरला आपली टोपी आणि स्वेटर दिला होता. त्यानंतर कुंबळेने एका डावात पूर्ण १० विकेट घेतल्या. यानंतर कुंबळे जेव्हा-जेव्हा गोलंदाजी करायला मैदानात यायचा, तेव्हा तो सचिनला आपली टोपी आणि स्वेटर द्यायचा. सचिनला टोपी दिल्याने कामगिरी चांगली होईल, असा कुंबळेचा विश्वास होता.