राहू हा नऊ ग्रहांपैकी सर्वात अशुभ ग्रह आहे, जो नेहमी उलटा प्रवास करतो. राहू हा शनीनंतर सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. राहूला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी १८ महिने लागतात. गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या अखेरीस राहूने मीन राशीत प्रवेश केला होता.
राहू ग्रह वर्षभर या राशीत भ्रमण करेल. २०२५ मध्ये तो आपली राशी बदलणार आहे. सर्व राशींवर संक्रमणाचा नक्कीच परिणाम होईल अशा प्रकारे केवळ राहू राशीपरिवर्तनच नव्हे तर राहूच्या प्रत्येक चालीचाही सर्व राशींवर परिणाम होईल.
भगवान राहूने आता उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला आहे. ८ मार्च २०२५ पर्यंत तो याच ग्रहात प्रवास करेल. राहूच्या उत्तरा भाद्रपद नक्षत्रतील संक्रमणाचा सर्व राशींवर प्रभाव पडेल. परंतू काही राशींना या बदलाचा लाभ होईल. जाणून घ्या या राशी कोणत्या आहेत.
तूळ :
राहूचे गोचर तुम्हाला विविध फायदे देणारे आहे. अनुकूल परिस्थिती लाभेल आणि नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती आणि पगारवाढ मिळू शकते. अनपेक्षित वेळी तुमच्या जीवनात घडामोडी घडतील. नोकरी आणि व्यवसायात चांगल्या घडामोडी घडतील.
मकर :
राहूचे गोचर तुम्हाला सर्व प्रकारचे लाभ देणार आहे. उत्तराभाद्रपद नक्षत्रातील गोचर तुम्हाला फायदेशीर ठरेल. अनुकूल परिणाम मिळतील. दांपत्य जीवनात अनपेक्षित सुधारणा होईल. तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल. अनपेक्षित वेळी नशिबाची साथ मिळेल. जीवनात आनंद वाढेल.