पंचागानुसार राधा अष्टमीचा सण भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या आठव्या दिवशी १० सप्टेंबर रोजी रात्री १० वाजून ११ मिनिटांपासून ते ११ वाजून ४६ मिनिटांपर्यंत चालणार आहे. सूर्योदयापासून तिथीची गणना केली जाते, म्हणून उदयातिथीनुसार राधा अष्टमी व्रत ११ सप्टेंबर रोजी साजरे केले जाईल.
राधा अष्टमी या सणाला सनातन धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. या दिवशी श्री राधा राणीचा जन्म झाला होता. असे मानले जाते की, या दिवशी उपवास करणे आणि श्री राधा राणीचे ध्यान करणे आणि काही विशेष उपाय केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतील.
राधाअष्टमीच्या दिवशी सकाळी ११.०३ ते दुपारी १:३२ पर्यंत तुम्ही राधा राणीची पूजा करू शकता. सौभाग्यासाठी तुळशीच्या पानावर पांढरे चंदन लावून ते श्री राधा कृष्णाच्या प्रतिमेला अर्पण करावे.
चौरंगावर लाल कपडा पसरवा आणि राधाकृष्णाची मूर्ती ठेवा. व्रताची संकल्पना करा, राधाराणीला सजवा. या दिवशी वाद टाळण्यासाठी अत्तर मिश्रित श्री राधा कृष्णाच्या प्रतिमेजवळ किंवा मुर्तीजवळ आठ धारी दिवा लावावा.
कोणत्याही प्रकारचे नुकसान टाळण्यासाठी श्री राधा कृष्णाच्या प्रतिमेर १२ झेंडूच्या फुलांच्या माळा अर्पण करा.
व्यावसायिक जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी हातात २ रुपयांचे नाणे घेऊन राधा कृष्णाचा जप आणि पूजा करा आणि पूजेनंतर नाणे सुरक्षित ठेवा.
अभ्यासात कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांनी श्री राधा कृष्णाच्या प्रतिमेसमोर किंवा मुर्तीसमोर ५ पांढरी फुले अर्पण करावीत.
जीवनात सुख, समृद्धी आणि शांतीसाठी राधाकृष्णाला प्रार्थना करा. व्यवसायात इच्छित नफ्यासाठी श्री राधा कृष्णासमोर नारळ आणि खडीसाखर अर्पण करा.
(depositphoto)प्रेम जीवनामधील अडचणी दूर करण्यासाठी पांढऱ्या कापडात ५ केळी बांधून राधा कृष्ण मंदिरात अर्पण करा.
(Freepik)