क्रिकेट सामन्यांदरम्यान अश्विनची पत्नी प्रिती नारायण पतीला चीयर करण्यासाठी अनेकदा स्टेडियममध्ये उपस्थित असते. प्रितीने जियो सिनेमाच्या कार्यक्रमात अश्विन आणि तिच्या लव्हस्टोरीचा खुलासा केला.
रवी अश्विन आणि प्रिती नारायण हे शाळेपासूनचे मित्र आहेत. त्यानंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
(photos- Prithi Narayanan instagram )प्रिती नारायणने एका मुलाखतीत सांगितले होते की, सातवीत असल्यापासून अश्विनचा माझ्यावर क्रश होता. तो नेहमीच माझा चाहता राहिला आहे. विशेष म्हणजे अश्विन माझ्यावर मरतो हे त्यावेळी संपूर्ण शाळेला माहीत होते, असेही प्रितीने सांगितले.
मात्र, क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी अश्विन त्या शाळेतून बाहेर पडला. पण ते दोघे नेहमी संपर्कात होते. १० वर्षांनंतर अश्विनने प्रितीला प्रपोज केले. पृथ्वी अश्विनने २०११ मध्ये लग्न केले, त्यांना २ मुली आहेत.