PV Sindhu Wedding Pics : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू २२ डिसेंबरला विवाहबंधनात अडकली. यानंतर आता आज सिंधूने तिच्या लग्नाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
(1 / 6)
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने २२ डिसेंबर रोजी उदयपूरमध्ये वेंकट दत्ता साई यांच्याशी लग्न केले. तेलुगु रितीरिवाजानुसार हे लग्न पार पडले.
(2 / 6)
सिंधू आणि वेंकट दत्ता साई यांच्या लग्नसोहळ्यात कुटुंबीय, मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी हजेरी लावली होती. सिंधूने आता सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करून आणखी चर्चा मिळवली आहे.
(3 / 6)
पीव्ही सिंधूने लग्नात क्रीम रंगाची साडी नेसली होती, तर दत्ता साईनेही त्याच रंगाची शेरवानी परिधान केली होती.
(4 / 6)
२२ डिसेंबर रोजी उदयपूरमध्ये लग्नानंतर दोघांनी २४ डिसेंबरला हैदराबादमध्ये एक मोठा रिसेप्शन आयोजित केला होता. जिथे दोघांच्या कुटुंबीयांव्यतिरिक्त इतरही अनेक सेलिब्रेटी आणि उद्योगपती उपस्थित होते.
(5 / 6)
पीव्ही सिंधूची बॅडमिंटन कारकीर्द चमकदार राहिली आहे. तिने २ ऑलिम्पिक पदके आणि ५ जागतिक चॅम्पियनशिप पदके जिंकली आहेत.
(6 / 6)
व्यंकट दत्ता साई हैदराबादमध्ये आपला व्यवसाय चालवतात. ते पॉसाइडेक्स टेक्नॉलॉजी नावाच्या कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत.