PV Sindhu : हताश… निराश फुलराणी, ऑलिम्पिक पदकांची हॅट्ट्रिक हुकल्यानंतर पीव्ही सिंधूने सांगितली मोठी गोष्ट, पाहा
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PV Sindhu : हताश… निराश फुलराणी, ऑलिम्पिक पदकांची हॅट्ट्रिक हुकल्यानंतर पीव्ही सिंधूने सांगितली मोठी गोष्ट, पाहा

PV Sindhu : हताश… निराश फुलराणी, ऑलिम्पिक पदकांची हॅट्ट्रिक हुकल्यानंतर पीव्ही सिंधूने सांगितली मोठी गोष्ट, पाहा

PV Sindhu : हताश… निराश फुलराणी, ऑलिम्पिक पदकांची हॅट्ट्रिक हुकल्यानंतर पीव्ही सिंधूने सांगितली मोठी गोष्ट, पाहा

Published Aug 02, 2024 10:59 AM IST
  • twitter
  • twitter
  • Paris Olympics 2024 Badminton: भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडली. यानंतर भारताची फुलराणी सिंधू खूपच निराश दिसली. पराभवानंतर तिने खेळात आपल्याकडून अनेक चुका झाल्याचे कबूल केले. विशेष म्हणजे, सिंधूचे हे पहिलेच ऑलिम्पिक आहे, ज्यात ती एकही पदक न जिंकता बाहेर पडली आहे.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या सहाव्या दिवसाची सुरुवात ही भारतासाठी शानदार झाली. पण दिवसाचा शेवट खूपच निराशाजनक झाला. ऑलिम्पिक २०२४ च्या सहाव्या दिवशी, एकीकडे नेमबाज स्वप्नील कुसळेने भारताला तिसरे पदक मिळवून दिले, तर दुसरीकडे देशाची स्टार शटलर पीव्ही सिंधूची ऑलिम्पिकमधील पदकांची हॅट्ट्रिक हुकली आणि तिचा पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील प्रवास संपला.
twitterfacebook
share
(1 / 6)

सिंधूची ऑलिम्पिकमधील पदकांची हॅट्ट्रिक हुकली- भारताच्या बॅडमिंटन विश्वाला मोठा धक्का बसला. पीव्ही सिंधूचा पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा प्रवास राउंड ऑफ १६ मध्ये संपला. सिंधूचा चीनच्या सहाव्या मानांकित हे बिंगजियाओने २१-१९, २१-१४ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. 
twitterfacebook
share
(2 / 6)

सिंधू एकही पदक न जिंकता बाहेर पडलेली ही पहिलीच तिची ऑलिम्पिक स्पर्धा आहे. यापूर्वी तिने रिओ २०१६ मध्ये रौप्य पदक आणि टोकियो २०२० मध्ये कांस्य पदक जिंकले होते.
twitterfacebook
share
(3 / 6)

पीव्ही सिंधू कमबॅक शकली नाही- पीव्ही सिंधूने पहिल्या सेटची चांगली सुरुवात केली, पण लवकरच बिंगजियाओने आघाडी घेतली. सिंधूने १२-१२ आणि नंतर १९-१९ अशी बरोबरी साधली, पण शेवटी बिंगजियाओने पहिला सेट २१-१९ असा जिंकला. सिंधूने दुसऱ्या सेटमध्येही पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र जिओने वर्चस्व राखत हा सेट २१-१४ असा जिंकला.
twitterfacebook
share
(4 / 6)

पराभवानंतर पीव्ही सिंधूने मोठी गोष्ट सांगितली-  पीव्ही सिंधूने तिचा सर्वोत्तम प्रयत्न केला पण ही बिंगजियाओचे आक्रमण जोरदार होते. अखेर सिंधूला पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर सिंधू खूपच निराश दिसली. विशेषत: दुसऱ्या सेटमध्ये तिला आपल्या चुकांवर नियंत्रण ठेवता आले नसल्याचे तिने सांगितले.
twitterfacebook
share
(5 / 6)

पीव्ही सिंधू म्हणाली, "हे निराशाजनक आहे... एक जण जिंकेल आणि एक हरेल, आणि आज मी हरले.." मी माझ्या चुकांवर नियंत्रण ठेवायला हवे होते... विशेषत: दुसऱ्या गेममध्ये मला हे करायचे होते. पण... हे दुःखद आहे की मी ते करू शकले नाही. पहिल्या गेममध्ये स्कोअर १९-१९ होता, तेव्हाच मला आक्रमक व्हायला हवे होते."
twitterfacebook
share
(6 / 6)

इतर गॅलरीज