
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा ‘पुष्पा २’ हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे आणि त्याचा पुरावा चित्रपटाच्या आगाऊ बुकिंग अहवालावरून दिसून येतो.
(instagram)चित्रपटाबद्दल बोलायचे तर, त्याचे बजेट ४०० कोटी रुपये किंवा त्याहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटातील कलाकारांनीही काम करण्यासाठी प्रचंड पैसे घेतले आहेत. चला तर, जाणून घेऊया कुणी किती मानधन घेतले…
(instagram)रिपोर्ट्सनुसार अल्लू अर्जुनने या चित्रपटासाठी ३०० कोटी रुपये मानधन घेतल्याचे म्हटले जात आहे. तथापि, अद्याप या चित्रपटाच्या कलाकार किंवा निर्मात्यांकडून याबद्दल कोणतेही अधिकृत अपडेट समोर आलेले नाही.
(instagram)रश्मिका मंदाना या चित्रपटात श्रीवल्लीची भूमिका साकारत आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने या चित्रपटासाठी १० कोटी रुपये घेतले आहेत. या चित्रपटासाठी रश्मिकाची फी पहिल्या भागापेक्षा जास्त असल्याचे बोलले जात आहे. रश्मिकाने पहिल्या भागासाठी २ कोटी रुपये घेतले होते.
(instagram)अभिनेता फहद फासिल हा चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसला आहे. त्याला 'पुष्पा २'साठी ८ कोटी रुपये मिळाले आहेत.
(instagram)या चित्रपटात श्रीलीलाचा खास डान्स नंबर आहे. 'किसिक' या गाण्यासाठी तिने २ कोटी रुपये घेतले आहेत.
(instagram)



