‘पुष्पा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान चित्रपटाचा मुख्य अभिनेता अल्लू अर्जुन जर्मनीतील बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाला होता. या जागतिक चित्रपट महोत्सवात ‘पुष्पा: द राईज’ पुन्हा प्रदर्शित होणार आहे.
अभिनेता अल्लू अर्जुन बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये अल्ट्रा स्टायलिश लूकमध्ये दिसला. काळ्या रंगाच्या या आऊटफिटमध्ये अल्लू अर्जुन राजबिंडा दिसत होता. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुष्पाची क्रेझ दिसली आहे.
अल्लू अर्जुन बर्लिन फिल्म फेस्टिव्हलदरम्यान आयोजित पार्टीला देखील हजर होता. या पार्टीत काही जागतिक स्तरावरील कलाकार देखील सामील झाले होते.
२०२१मध्ये प्रदर्शित झालेला ‘पुष्पा’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटामुळे अल्लू अर्जुन भारतात प्रचंड लोकप्रिय झाला. आता ‘पुष्पा २: द रुल’ हा चित्रपट सुकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली बनत आहे. त्यांचा हा चित्रपट यावर्षी १५ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.