Top Movies : 'पुष्पा २'ने अवघ्या ६ दिवसांत कमावले १००० कोटी; 'या' चित्रपटांनाही टाकलं मागे!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Top Movies : 'पुष्पा २'ने अवघ्या ६ दिवसांत कमावले १००० कोटी; 'या' चित्रपटांनाही टाकलं मागे!

Top Movies : 'पुष्पा २'ने अवघ्या ६ दिवसांत कमावले १००० कोटी; 'या' चित्रपटांनाही टाकलं मागे!

Top Movies : 'पुष्पा २'ने अवघ्या ६ दिवसांत कमावले १००० कोटी; 'या' चित्रपटांनाही टाकलं मागे!

Dec 12, 2024 07:22 PM IST
  • twitter
  • twitter
1000 Cr Club Movies : रिलीजनंतर अवघ्या ६ दिवसांच्या आत ‘पुष्पा २’ या चित्रपटाने १००० कोटींचा टप्पा ओलांडला. 'आरआरआर', 'जवान' आणि 'कल्की २८९८ एडी' सारख्या इतर ब्लॉकबस्टर चित्रपटांना १००० कोटींचा आकडा पार करण्यास किती वेळ लागला ते पाहूया...
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २ : द रूल' या चित्रपटाने आठवडाभरात अनेक विक्रम मोडीत काढत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर सर्वात जलद १००० कोटींचा टप्पा ओलांडणारा विक्रम मोडला. रिलीजनंतर ६ दिवसांच्या आत या चित्रपटाने मोठा टप्पा ओलांडला. 'आरआरआर', 'जवान' आणि 'कल्की २८९८ एडी' सारख्या इतर ब्लॉकबस्टर चित्रपटांना १००० कोटींचा आकडा पार करण्यास किती वेळ लागला ते पाहूया…
twitterfacebook
share
(1 / 8)
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २ : द रूल' या चित्रपटाने आठवडाभरात अनेक विक्रम मोडीत काढत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर सर्वात जलद १००० कोटींचा टप्पा ओलांडणारा विक्रम मोडला. रिलीजनंतर ६ दिवसांच्या आत या चित्रपटाने मोठा टप्पा ओलांडला. 'आरआरआर', 'जवान' आणि 'कल्की २८९८ एडी' सारख्या इतर ब्लॉकबस्टर चित्रपटांना १००० कोटींचा आकडा पार करण्यास किती वेळ लागला ते पाहूया…(HT_PRINT)
'पुष्पा २'च्या आधी 'बाहुबली २', 'कल्की २८९८ एडी', 'केजीएफ : चॅप्टर २', 'आरआरआर', 'जवान', 'पठान' आणि 'दंगल' या चित्रपटांनी हा टप्पा गाठला होता.
twitterfacebook
share
(2 / 8)

'बाहुबली २ : द कन्क्लूजन'ने अवघ्या १० दिवसांत १००० कोटींचा टप्पा ओलांडणारा पहिला भारतीय चित्रपट होण्याचा विक्रम केला आहे. 'बाहुबली २ : द कन्क्लूजन' हा २०१५मध्ये आलेल्या 'बाहुबली : द बिगिनिंग'चा सिक्वल असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन एसएस राजामौली यांनी केले आहे. या चित्रपटात प्रभास, राणा दग्गुबाती, तमन्ना भाटिया आणि सत्यराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तो २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता.
twitterfacebook
share
(3 / 8)

'बाहुबली २'नंतरचा दुसरा चित्रपट म्हणजे यावर्षी प्रदर्शित झालेला 'कल्की २८९८ एडी' नाग अश्विन दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि कमल हासन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या १५ दिवसांत जगभरातील बॉक्स ऑफिसवर १००० कोटींची कमाई केली. हा चित्रपट २७ जून रोजी जगभरात प्रदर्शित झाला होता.
twitterfacebook
share
(4 / 8)

'केजीएफ: चॅप्टर २' हा २०१८मधील हिट 'केजीएफ: चॅप्टर १'चा सिक्वेल आहे. दोन भागांची ही कथा रॉकी (यश) या अनाथ मुलाची गरिबीतून उठून सोन्याच्या खाणीचा राजा बनण्याची कथा आहे. संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी आणि प्रकाश राज यांच्याही या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाने १६ दिवसांत १००० कोटी कमावले होते.
twitterfacebook
share
(5 / 8)

दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा ऑस्कर विजेता 'आरआरआर' या चित्रपटाचा या यादीत समावेश आहे. 'आरआरआर'नेही १६ दिवसांत १००० कोटींचा टप्पा ओलांडला. 'आरआरआर' हा एक बहुभाषिक अॅक्शन चित्रपट आहे, जो २०व्या शतकाच्या प्रारंभी दोन स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनावर आधारित एक काल्पनिक कथा सांगतो. अल्लूरी सीताराम राजू आणि कुमराम भीम, या भूमिका अनुक्रमे राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यांनी साकारल्या आहेत.
twitterfacebook
share
(6 / 8)

शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाने गेल्या वर्षी १००० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला होता. एटली दिग्दर्शित 'जवान' या चित्रपटाला १००० कोटींचा टप्पा गाठण्यासाठी अवघे १८ दिवस लागले. समाजातील चुका सुधारण्यासाठी निघालेल्या माणसाची कहाणी 'जवान'ने मांडली आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत विजय सेतुपती आणि नयनतारा यांच्याही भूमिका आहेत.
twitterfacebook
share
(7 / 8)

२०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पठान' या चित्रपटानेही जगभरातील बॉक्स ऑफिसवर १००० कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित झाला आणि सुमारे चार आठवड्यांनंतर म्हणजे २१ फेब्रुवारीला जगभरात १००० कोटींचा टप्पा ओलांडला. त्यासाठी त्याला २७ दिवस लागले.
twitterfacebook
share
(8 / 8)

आमिर खानच्या 'दंगल'ने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती, विशेषत: चीनमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. १५४ दिवसांनंतर जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने १००० कोटींचा टप्पा ओलांडला. नितेश तिवारी दिग्दर्शित आणि आमिरची मुख्य भूमिका असलेला दंगल हा चित्रपट माजी कुस्तीपटू महावीर सिंग फोगट आणि त्यांच्या मुली गीता आणि बबिता यांची कथा आहे.
twitterfacebook
share
(9 / 8)

इतर गॅलरीज