नव्या वर्षाची खास भेट! FD वर ८ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देणार 'ही' सरकारी बँक
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  नव्या वर्षाची खास भेट! FD वर ८ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देणार 'ही' सरकारी बँक

नव्या वर्षाची खास भेट! FD वर ८ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देणार 'ही' सरकारी बँक

नव्या वर्षाची खास भेट! FD वर ८ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देणार 'ही' सरकारी बँक

Jan 04, 2025 12:04 PM IST
  • twitter
  • twitter
PNB FD Rates : पंजाब नॅशनल बँकेनं आपल्या ग्राहकांना नव्या वर्षाचं खास गिफ्ट दिलं आहे. बँकेनं एफडीच्या दरात बदल केला आहे. त्यामुळं ग्राहकांना आता एफडीवर 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज मिळणार आहे. जाणून घेऊया सविस्तर…
PNB FD Rates : एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. सरकारी बँक पंजाब नॅशनल बँकेनं एफडीच्या दोन नवीन स्कीम आणल्या आहेत. तसंच, जुन्या दरांमध्येही बदल केला आहे. नवीन दर आणि नवीन योजना १ जानेवारी २०२५ पासून लागू झाल्या आहेत. या नव्या योजना व दर ३ कोटींपेक्षा कमी रकमेच्या एफडीसाठी आहेत.
twitterfacebook
share
(1 / 5)

पंजाब नॅशनल बँकेनं ३०३ दिवसांचा नवीन एफडी प्लॅन लॉन्च केला आहे. बँक ३०३ दिवसांच्या FD वर ७ टक्के व्याज देणार आहे. तर, ५०६ दिवसांच्या एफडीवर ६.७ टक्के व्याज देणार आहे.
twitterfacebook
share
(2 / 5)

सध्या सर्वसाधारण ग्राहकांना पंजाब नॅशनल बँकेकडून FD वर ३.५ टक्के ते ७.२५ टक्के व्याज मिळते. बँकेतर्फे गुंतवणूकदारांना ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या FD चा पर्याय दिला जात आहे. ४०० दिवसांच्या FD वर बँकेकडून सर्वाधिक व्याज मिळते. PNB ग्राहकांना या कालावधीसाठी ७.२५ टक्के व्याज मिळेल.
twitterfacebook
share
(3 / 5)

ज्येष्ठ नागरिकांना पीएनबी बँकेकडून एफडीवर जास्तीत जास्त ७.७५ टक्के व्याज दिलं जातं. ज्येष्ठ नागरिकांना ४०० दिवसांच्या FD वर बँकेकडून सर्वाधिक व्याज मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना ७ दिवस ते १० वर्षांपर्यंत FD करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
twitterfacebook
share
(4 / 5)

पंजाब नॅशनल बँकेनं अति वरिष्ठ नागरिक नावाची नवीन श्रेणी तयार केली आहे. या अति वरिष्ठ नागरिकांना ४०० दिवसांच्या एफडीवर ८.०५ टक्के व्याज दिलं जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना ३ कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर किमान ४.३ टक्के व्याज मिळेल. त्याच वेळी, कमाल व्याज ८.०५ टक्के आहे.
twitterfacebook
share
(5 / 5)

FD ही अशी गुंतवणूक आहे, जिथं परताव्याची हमी असते. त्यामुळंच गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असतानाही एफडी आजही खूप लोकप्रिय आहे.
twitterfacebook
share
(6 / 5)

इतर गॅलरीज