(5 / 7)शनिवारी सकाळपर्यंत टेमघर धरण परिसरात ४८ मिलीमीटर, वरसगाव आणि पानशेत धरण परिसरात प्रत्येकी २४ मि.मी. आणि खडकवासला धरण क्षेत्रात ८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे सकाळी दहा वाजता वरसगाव धरणातून ८६२ क्युसेक, तर पानशेत धरणातून ८४९ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली.