
मध्य रेल्वे व्हिस्टाडोम कोचची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत सुमारे १,४७,४२९ प्रवाशांनी व्हिस्टाडोम डब्यांमधून प्रवास केला.
मुंबई-गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या आणि धबधब्यांची आकर्षण आणि मनमोहक दृश्ये असोत किंवा मुंबई-पुणे मार्गावरील पश्चिम घाटाची नयनरम्य दृश्ये असोत, काचेचे टॉप आणि रुंद खिडक्या असलेले हे डबे लोकप्रिय ठरत आहेत.
गेल्या वर्षभरात १.४७ लाख प्रवाशांनी या डब्यातुन प्रवास केला असून त्यातून २१.९५ रुपयांचा महसूल रेल्वेला मिळाला आहे.
मध्य रेल्वेने काही निवडक गाड्यांमध्ये व्हिस्टाडोम डब्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याची सुरुवात २०१८ मध्ये मुंबई-मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेसपासून झाली. याला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्याने इतर गाड्यांमध्ये या डब्यांचा वापर करण्यात आला.


