
खेड तालुक्यातील कारकुडी परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे येथील कारकुडीचा धबधबा वाहू लागला आहे. येथील निसर्ग पर्यटकांना साद घालत आहेत.
खेड तालुक्यातील पर्यटनासाठी आणि ट्रेकींगसाठी प्रसिद्ध असलेल्या भोरगीरी येथील डोंगर रांग धुक्याने आच्छादली आहे.
चिखलगाव येथील नदीच्या पात्राने तळ गाठला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे नदी पुन्हा प्रवाहित झाली आहे.

