पुणे लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान होत आहे. महायुती कडून भाजपचे मुरलीधर मोहोळ तर महाविकास आघाडीकडून कॉँग्रेचे उमेदवार रवींद्र धंगेकर निवडणूक रिंगणात उभे आहेत.
आज सकाळ पासून पुणे शहरात मतदानास सुरुवात झाली. सकाळ पासून मतदान करण्यासाठी पुणेकरांनी रांगा लावल्या होत्या.
पुणे लोकसभेअंतर्गत वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट व कसबा पेठ विधानसभा मतदार संघ अशा सहा ठिकाणांहून जिल्हाधिकारी तथा पुणे लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले.
पुण्यातील अनेक मतदान केंद्र हे सजवण्यात आले आहे. या ठिकाणी सेल्फी पॉइंट देखील तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी मतदान झाल्यावर मतदार सेल्फी काढण्यात मग्न असल्याचे मतदान केंद्रांवर दिसून आले.
सर्व मतदान केंद्रांवर किमान आश्वासित सुविधा, औषधोपचार किट, शारीरिक विकलांग मतदार, ज्येष्ठ नागरिक मतदार यांना मदत करण्यासाठी तसेच केंद्रावरील रांगांचे व्यवस्थापनात सहाय्य करण्यासाठी स्वयंसेवक, ज्येष्ठ, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर तसेच मतदान केंद्रापर्यंत येण्यास सक्षम नसलेल्या मतदारांनी मागणी केल्यास घरुन मतदान केंद्रापर्यंत आणणे व मतदानानंतर घरी सोडण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
मतदान कारणाऱ्यात नव मतदारांची संख्या मोठी आहे. देशाच्या विकासासाठी आणि लोकशाहीचे हक्क बाजवण्यासाठी आम्ही आमचा हक्क बजावत असल्याचे मत काही तरुणांनी व्यक्त केले.
अधिकाधिक पात्र मतदारांनी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन डॉ. दिवसे यांनी केले आहे.
भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील कोथरूड येथील मतदांन केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.