Pune Rain : पुण्याला पावसाने सलग दुसऱ्या दिवशी झोडपले! रस्त्यांवर साचले पाणी; हवामान विभागाचा आजही यलो अलर्ट-pune has been hit by rain for the second day in a row water logging on roads meteorological department yellow alert ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Pune Rain : पुण्याला पावसाने सलग दुसऱ्या दिवशी झोडपले! रस्त्यांवर साचले पाणी; हवामान विभागाचा आजही यलो अलर्ट

Pune Rain : पुण्याला पावसाने सलग दुसऱ्या दिवशी झोडपले! रस्त्यांवर साचले पाणी; हवामान विभागाचा आजही यलो अलर्ट

Aug 20, 2024 07:54 AM IST
  • twitter
  • twitter
  • Pune Rain : पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. रविवारी व सोमवारी झालेल्या ढगफूटी सदृश्य पावसाने पुणेकरांची दाणादाण उडाली. पुणे रेल्वे स्थानक, वडगाव शेरी, सुस पाषाण, आदि परिसरात मुसळधार पावसाची नोंद झाली. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.
पुल्याला सोमवारी देखील पावसाने झोडपले.  दुपार आणि संध्याकाळच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह, शहराच्या काही भागांत सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) आकडेवारीनुसार, वडगावशेरी येथे सायंकाळी ६:१५ पर्यंत १११ मिमी, त्यानंतर लोहेगाव (रात्री ८.३० वाजेपर्यंत ४८ मिमी) पावसाची नोंद झाली.
share
(1 / 6)

पुण्यात शुक्रवारपासून पावसाने वेग घेतला आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या मते, सध्याच्या पावसाच्या हालचाली मुख्यतः स्थानिक हवामानाच्या परिस्थितीशी संबंधित आहेत ज्यामुळे  पुणे शहरावर ढग तयार होत आहेत.  गेल्या दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह वादळी ढग तयार होत असल्याने हा पुस पडत आहे. या सोबत  ताशी ४०-५०  किमी प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. पुण्यात सोमवारी झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले. या पाण्यात वाहने बंद पडल्याने त्यांना धक्का मारून नेण्याची वेळ वाहनचालकांवर आली. 
share
(2 / 6)

नाशिक, औरंगाबाद, हिंगोली, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग, धुळे, पालघर, उस्मानाबाद, रत्नागिरी आणि ठाणे या जिल्ह्यांमध्येही अशीच परिस्थिती दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुणेकरांनी जो हवामानाचा अनुभव घेतला आहे तो मान्सूनचा पाऊस नाही. सध्या सकाळपासून दुपारपर्यंत हवामान उष्ण व दमट आहे. दुपारपासून पुणे शहरावर ढग तयार होण्यास सुरुवात होते,
share
(3 / 6)

 संध्याकाळच्या सुमारास ते हळूहळू क्यूम्युलस ते क्यूम्युलोनिम्बस ढग विकसित होते आणि ज्या भागातून ढग जातात त्या  भागात गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह काही तास जोरदार  पाऊस पडतो. मान्सूनच्या पावसात  दिवसभर ढगाळ वातावरण राहून सतत पाऊस पडतो,  असे पुणे वेध शाळेचे  हवामान आणि अंदाज विभागाचे माजी प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले.
share
(4 / 6)

पासवामुळे पुणेकरांची त्रेधा उडाली होती.  शहरात विविध भागात मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद झाल्याने शहरातील अनेक भागात पाणी साचले तसेच यामुळे  वाहतूक कोंडी देखील झाली. पुणे स्थानक परिसरात भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. 
share
(5 / 6)

लोहेगाव परिसरात राहणारे सुशील पवार म्हणाले, “मी संध्याकाळी घरी परतत होतो. मात्र, येरवड्यात पाणी साचून मोठी वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यावर पाऊस आणि पाणी साचल्यामुळे वाहनांच्या संथ गतीने वाहतूक कोंडी झाली.  
share
(6 / 6)

इतर गॅलरीज