Dagadusheth Ganapati : दगडूशेठ गणपतीला ५० लाख मोगऱ्यांचा पुष्पनैवेद्य, पाहा गणरायाचे विलोभनीय रूप
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Dagadusheth Ganapati : दगडूशेठ गणपतीला ५० लाख मोगऱ्यांचा पुष्पनैवेद्य, पाहा गणरायाचे विलोभनीय रूप

Dagadusheth Ganapati : दगडूशेठ गणपतीला ५० लाख मोगऱ्यांचा पुष्पनैवेद्य, पाहा गणरायाचे विलोभनीय रूप

Dagadusheth Ganapati : दगडूशेठ गणपतीला ५० लाख मोगऱ्यांचा पुष्पनैवेद्य, पाहा गणरायाचे विलोभनीय रूप

Apr 29, 2024 02:22 PM IST
  • twitter
  • twitter
  • Dagadusheth Halwai Ganapati Mandir : पुण्यातील प्रसिद्ध 'दगडूशेठ' गणपतीला मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने ५० लाख मोग-याचा पुष्पनैवेद्य दाखवण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे याचे आयोजन करण्यात आले होते.
सुवासिक फुलांनी सजलेले दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि लाडक्या गणरायाचे रुप डोळ्यांमध्ये साठविण्यासाठी मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली. मोग-याच्या ५० लाख फुलांसह झेंडू, जास्वंद, गुलाब, चाफा सारख्या फुलांनी गाभा-यासह सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली. फुलांचे शुंडाभूषण, मुकुट, कान व पुष्पवस्त्र परिधान केलेले गणरायाचे रुप अधिकच मनोहारी दिसत होते.
twitterfacebook
share
(1 / 5)

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी आदी उपस्थित होते.
twitterfacebook
share
(2 / 5)

दोन दिवसांपासून पुष्पसजावटीची तयारी तब्बल २५० महिला व १०० पुरुष कारागिर करीत होते. यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये ३५०० किलो गुलछडी, ८०० किलो झेंडू, १२० किलो कन्हेर फुले, १ लाख गुलाब, ७० हजार चाफा, १०० कमळे, १ लाख लिली, जाई-जुई, जास्वंद यांसह अनेक प्रकारची फुले वापरण्यात आली होती. 
twitterfacebook
share
(3 / 5)

गणरायाच्या मूर्तीला केलेली रंगीबेरंगी फुलांची सजावट प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये टिपत होता. गणरायाच्या चांदीच्या मूर्तीला  उटीचे लेपन करण्यात आले. तसेच मोगरा महोत्सवासह वासंतिक उटीचे भजन भारतीय वारकरी मंडळातर्फे करण्यात आले.  
twitterfacebook
share
(4 / 5)

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. 
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज