Pune :पुण्यात पावसाचा हाहाकार! सिंहगड रोड येथील अनेक सोसायट्यांमध्ये घुसले पाणी; ३०० हून अधिक लोक अडकले; बचावकार्य सुरू
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Pune :पुण्यात पावसाचा हाहाकार! सिंहगड रोड येथील अनेक सोसायट्यांमध्ये घुसले पाणी; ३०० हून अधिक लोक अडकले; बचावकार्य सुरू

Pune :पुण्यात पावसाचा हाहाकार! सिंहगड रोड येथील अनेक सोसायट्यांमध्ये घुसले पाणी; ३०० हून अधिक लोक अडकले; बचावकार्य सुरू

Pune :पुण्यात पावसाचा हाहाकार! सिंहगड रोड येथील अनेक सोसायट्यांमध्ये घुसले पाणी; ३०० हून अधिक लोक अडकले; बचावकार्य सुरू

Published Jul 25, 2024 11:36 AM IST
  • twitter
  • twitter
  • Pune Flood : पुण्यात आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून मुठा नदीला पुर आला आहे. या पुरामुळे पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी घुसले आहे. सध्या अग्निशामक दल आणि एनडीआरएफच्या पथकाद्वारे बचाव कार्य सुरू आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यात कालरात्रीपासूंन जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आल्यामुळे  सिंहगड रस्ता येथील काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. काही सोसायट्यांचा पार्किंग परिसर हा संपूर्ण पाण्याखाली गेला आहे. काही घरात पाणी शिरल्याने नागरिकांना रात्र जगून काढावी लागली आहे. महापालिका कर्मचारी, प्रशासन आणि पोलीसही देखील मदतीला नसल्याने येथील नागरिक हतबल झाले होते. तब्बल ३०० पेक्षा जास्त नागरिक या पाण्यात अडकून पडले होते. 
twitterfacebook
share
(1 / 12)

एकता नगरी सिंहगडरोड, द्वारका, जलपुजन, शारदा सरोवर, शाम सुंदर या सोसाट्यांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. पार्किंगमध्ये पाणी आल्यानं वाहनांचंही नुकसान झाले आहे. यावर्षी पुणे महानगरपालिकेनं महापुराच्या अनुशंगाने कोणतीही पूर्वतयारी केली नसल्याचे उघड झाले आहे. 
twitterfacebook
share
(2 / 12)

पुण्यात पावसाचा जोर वाढला असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रात ३५  हजार ५७४  क्युसेक्स विसर्ग सुरू  आहे.   पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
twitterfacebook
share
(3 / 12)

वारजे, स्वामी विवेकानंद सोसायटी व फ्युचेरा सोसायटीत - शिवणे, सदगुरू सोसायटीत - सिहंगड रोड याठिकाणी सरिता नगरी, एकता नगरी व इतर तीन सोसायटीमध्ये - नदीपाञ रस्ता, रजपुत वीटभट्टी नजीक, गंजपेठ, चांदतारा चौक - शिवाजीनगर येथे पाणी साचले असून पुरस्थिती निर्माण झाली आहे. 
twitterfacebook
share
(4 / 12)

शहरात तब्बल ४५ ठिकाणी झाडे कोसळली आहेत.  तर दोन भवानी पेठेत वाड्याची भिंत कोसळली तर   कोरेगांव पार्क, बर्निंग घाट नजीक भिंत कोसळली आहे. 
twitterfacebook
share
(5 / 12)

अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान व एनडीआरएफचे पथक  पुरात आणि सोसायट्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.  
twitterfacebook
share
(6 / 12)

हवामान विभागानं येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय.  
twitterfacebook
share
(7 / 12)

खडकवासला धरण १०० टक्के भररले आहे.  तर टेमघर ५७ टक्के, वरसगाव ६३ टक्के, पानशेत ७६ टक्के भरले आहे. 
twitterfacebook
share
(8 / 12)

पुण्यातील महानगर पालिकेजवळ महाकाय वृक्ष कोसळल्यामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. 
twitterfacebook
share
(9 / 12)

या ठिकाणी झाड पडल्यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली आहे. हे झाड तोडून बाजूला करण्याचे काम सुरू आहे. 
twitterfacebook
share
(10 / 12)

पुण्यातील मुठा नदीचे दुथडी भरून वाहणारे पात्र.
twitterfacebook
share
(11 / 12)

पुण्यातील मुठा नदीचे दुथडी भरून वाहणारे पात्र.

पुण्यातील बोपोडी येथील हॅरिस ब्रिज खालून वाहणारे पाणी. 
twitterfacebook
share
(12 / 12)

इतर गॅलरीज