
पुण्यात कॅम्प परिसरात नाताळ साजरा करण्यासाठी पुणेकर जमले होते. येथील रस्ते नागरिकांच्या गर्दीने फुलून गेले होते. मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडल्याने वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळाली.
पुण्यातील जंगली महाराज रोड, फर्ग्युसन रस्ता तसेच कॅम्प परिसरातील एमजी मार्गावर मोठ्या प्रमाणात नागरिक जमले होते.
एमजी मार्गावर आज ख्रिसमसनिमित्त वॉकिंग प्लाझा घोषित करण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात नागरिक आणि व्यावसायिक या ठिकाणी जमले होते.
या ठिकाणी लहानमुलांचा उत्साह जास्त जाणवत होता. रस्त्यावर रोषणाई करण्यात आली होती. विविधवेशभुशेत असलेले नागरिक लहान मुलांना गिफ्ट देत होते.


