घरातील मंदिर जितके महत्त्वाचे आहे, तितक्याच मंदिरात ठेवलेल्या वस्तूही महत्त्वाच्या आहेत. ज्योतिषांच्या मते, घराच्या मंदिरात अशा काही गोष्टी नेहमीच ठेवाव्यात, ज्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात आणि घरावर लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो.
गंगाजल- गंगाजल सर्वात पवित्र मानले जाते. घराच्या मंदिरात गंगाजल नेहमी ठेवावे आणि नित्यनियमाने ते शिंपडत रहावे.
शंख - देवघरात शंख असला पाहिजे. पूजेनंतर शंखनाद अवश्य करावा, शंखाचा आवाज दररोज ऐकल्याने मनशांती मिळते. तसेच, घरात शांती प्रस्थापित होते.
तुळशीचे रोप- असे मानले जाते की, ज्याच्या घरात तुळशीचे रोप उगवते त्याच्या घरात प्रगती होते. पण पूजा खोलीच्या मध्यभागी शालिग्राम असणे खूप शुभ मानले जाते.