Wrestlers Protest New Delhi : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर बलात्काराचे आरोप करत महिला कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केलं आहे.
(PTI)साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया या कुस्तीपटूंनी भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
(PTI)गेल्या दोन आठवड्यांपासून कुस्तीपटू दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन करत आहे. त्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचा आरोप आंदोलक कुस्तीपटूंनी केला आहे.
(PTI)दिल्ली पोलीस आंदोलनस्थळी पोहचल्यानंतर कुस्तीपटूंना रडू कोसळलं. साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांनी पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोप केला.
(PTI)दिल्ली पोलीस आंदोलनस्थळी पोहचल्यानंतर कुस्तीपटूंना रडू कोसळलं. साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांनी पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोप केला.
(PTI)मद्यप्राशन केलेल्या पोलिसांनी आम्हाला शिवीगाळ करत मारहाण केली आहे, हे दिवस पाहण्यासाठी आम्ही देशासाठी पदके आणली होती का?, असा सवाल आंदोलक कुस्तीपटू विनेश फोगाटने मोदी सरकारला केला आहे.
(PTI)पोलिसांशी वाद झाल्यानंतर आंदोलक कुस्तीपटूंच्या डोळ्यात अश्रू तरळले. यावेळी कुस्तीपटूंनी सरकारला खडेबोल सुनावले आहे.
(PTI)