Pakistan Election 2024: पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकीत मतमोजणीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर हेराफेरी करण्यात आल्याचा आरोप करत विविध पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. राजधानी इस्लामाबादसह लाहोर, कराची, पेशावर या शहरांमध्ये निदर्शनं करण्यात येत आहेत.